Home Covid- 19 चंद्रपूर शहरात ७३ हजारांवर नागरिकांचे लसीकरण ६३ हजार ८६२...

चंद्रपूर शहरात ७३ हजारांवर नागरिकांचे लसीकरण ६३ हजार ८६२ कोविशिल्ड, तर ९ हजार ५४४ कोव्हॅक्सीन

48
0

चंद्रपूर शहरात ७३ हजारांवर नागरिकांचे लसीकरण
६३ हजार ८६२ कोविशिल्ड, तर ९ हजार ५४४ कोव्हॅक्सीन

चंद्रपूर, ता. १९ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस दिली जात आहे. एकूण ७३ हजार ४०६ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६३ हजार ८६२ कोविशिल्ड, तर ९ हजार ५४४ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना लस देण्यात आली. त्यात ७ हजार ३४५ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ४ हजार ६३६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ४ हजार ४१७ जणांना पहिला डोस व २ हजार ३७६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १८ हजार ७७४ डोस देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत २७ हजार ७८५ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस तर ८ हजार ४०८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तसेच ११ हजार ३०५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोस, तर २६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला.
शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी केंद्र निर्धारित करण्यात आले होते. यात ३ हजार ३१ जणांना कोविशिल्ड तर, १५०३ जणांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत आतापर्यंत एकूण ७३ हजार ४०६ जणांनी लसीची पहिली आणि दुसरी मात्रा घेतली. यात ६३ हजार ८६२ कोविशिल्ड, तर ९ हजार ५४४ जणांनी कोव्हॅक्सीन लस घेतली.

लसीकरण संदर्भात महत्वाच्या सूचना

– कोरोना झालेल्या व्यक्तींनी बर झाल्यावर तीन महिन्यानंतर लसीचा पहिला डोस घ्यावा.
– एखाद्या कोरोना रुग्णाला प्लाझ्मा दिला असल्यास त्यांनी सुद्धा रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर तीन महिन्यानंतर लस घ्यावी.
– लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याआधी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास अशा व्यक्तींनी बरं झाल्यावर तीन महिन्यानंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा.
– लस घेतल्यावर 14 दिवसानंतर किंवा कोव्हिड-19 RT-PCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याच्या 14 दिवसानंतर वैयक्तिकरित्या ‘रक्तदान’ करू शकता.
– स्तनपान करणाऱ्या सर्व महिलांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घ्यावी.
– लस घेण्याआधी रॅपिड अँटीजन टेस्टची आवश्यकता नाही.
– अन्य आजारावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या व्यक्तींनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनी लस घ्यावी.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here