Home विशेष आजच्या दिवशी चंद्रपूर किल्लावर फडकला होता ब्रिटीश ‘युनीयन जॅक’* *20 मे...

आजच्या दिवशी चंद्रपूर किल्लावर फडकला होता ब्रिटीश ‘युनीयन जॅक’* *20 मे 1818 रोजी झाले युध्द* *चंद्रपुर येथील मराठेचा इंग्रजासोबतच्या युध्दास 203 वर्ष पुर्ण,*

97
0

*आजच्या दिवशी चंद्रपूर किल्लावर फडकला होता ब्रिटीश ‘युनीयन जॅक’*
*20 मे 1818 रोजी झाले युध्द*
*चंद्रपुर येथील मराठेचा इंग्रजासोबतच्या युध्दास 203 वर्ष पुर्ण,*
*आणि, चंद्रपुर ब्रिटीशांच्या ताब्यात गेला…*

चंद्रपूर येथील इंग्रजांच्या युध्दास आज 203 वर्ष पुर्ण होत असुन आजच्या दिवशी चंद्रपूर किल्लाच्या पठाणुपरा गेटवर इंग्रजांचा ‘युनीयन जॅक’ फडकला होता. या ऐतीहासीक युध्दात अनेक सरदार, सैनीक कामास आली होती. या युध्दाच्या काही स्मारक, समाध्या अस्तित्वात असुन या घटनास्थळी भेट देवून इतीहास जाणुन घेण्याच्या दृष्टीने या सर्व स्थळावर दरवर्षी या दिवशी इको-प्रो संस्थेच्या पुरातत्व संवर्धन विभागाच्या वतीने हेरीटेज वाॅकचे आयोजन करण्यात येत असते, मात्र यंदा कोविड आपदा मुळे या उपक्रमाचे आयोजन करता आले नाही.

इको-प्रोचे चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सुरू जवळपास 1000 दिवस राबविन्यात आले असुन रोज नियमीत किल्ला स्वच्छतेचे काम सुरू होते, प्रशासन व शासन स्तरावर सुध्दा याकडे योग्य लक्ष लागले होते. या अभियानाचा दुसरा टप्पात चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक वारसा बाबत जनजागृती व्हावी, महत्व पटावे म्हणुन चंद्रपुरकर नागरिकां करिता ‘हेरीटेज वाॅक’ ही संकल्पना पुढे आणुन या किल्ला व ऐतिहासिक स्थळा वरून इतीहासाची माहीती घेत फेरफटका मारत माहिती देण्याचा उपक्रम सुद्धा सुरु करण्यात आला होता, यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

*चंद्रपूर इतीहासातील इंग्रज-मराठे युद्ध*

भोसल्यासोबत झालेला ‘चंद्रपूरचा तह’ चंद्रपूर येथील शेवटचे गोंडराजे निळकंठशहा यांनी पाळला नाही. त्यामुळे रघुजी भोसले यांना 1751 मध्ये चंद्रपूर वर धडक दयावी लागली. त्यात निलकंठशहा यांचा पूर्ण पराभव करून त्यास कैद केले व बल्लारपूर च्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. अखेरीस या वैभवशाली राजगोंड राज्याचा अशाप्रकारे अस्त झाला. पहील्या रघुजीने 1751 मध्ये चंद्रपूर चे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले होते. गोंडराजे निलकंठशहा पेंशन बाधुन दिली होती. नंतर ती त्यांचा वंशात सुरू होती.

चंद्रपूरच्या वैभवशाली किल्लावर व राज्यावर भोसलेबंधु, पेशवे, निजाम या सर्वाचीच वक्रदृष्टी होती. मधला काळा भोसले भाऊबंदकी मध्येच गेला. यानंतर भोसल्याचे राज्य सुध्दा इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. त्यानी 1816 मध्ये इंग्रजांच्या ‘तैनाती फौजेचा तह’ करून स्वाक्षरी केल्या होत्या. पुढे जानेवारी 1818 च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दयावे असे ठरले असताना, तो अदयाप देण्यात आलेला नव्हता. म्हणुन इंग्रज फौजेनी चंद्रपूरच्या किल्लास 9 मे 1818 रोजी वेढा दिला. 9 मे ते 13 मे पठाणपुरा बाहेरील माना टेकडयावरून तोफेचे मोर्चे बांधले व 13 मे पासुन तोफेचा भडीमार सुरू केला. भोसलेच्या फौजांनीही तोफांनाी प्रतीहल्ला चढवीला. सतर चार दिवस सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणी मजबुत असल्याने शक्य झाले नाही. प्र्रथम 400 यार्ड वरून तोफा डागण्यात आल्या, किल्ला अभंगच नंतर 250 यार्ड वरून 18 पौंडी तोफाचे मोर्चे बांधले. अख्यायीका नुसार अशुभ बुरूज असलेल्या ठिकाणाहुन इंग्रजांना आशा असल्याने त्या ठिकाणी तोफेचा मारा करण्यात आला आणी 19 मे ला किल्ला भंगला, त्यास खिंडार पडले मात्र हे रात्रीतुन भगदाड बंद करतील म्हणुन इंग्रजांनी रात्रभर जागता पहारा ठेवत बंदुकांचा मारा सतत सुरू ठेवला. दुसरे दिवशी 20 मे 1818 रोजी या खिंडारातुन सैनीक शहरात आत घुसले. यावेळी गोंडराजांनी सुध्दा आपले सैनीक तयार ठेवले होते मात्र इंग्रजांच्या रणसाहीत्यापुढे काही इलाज चालला नाही.

*चंद्रपुर किल्ल्याचे किल्लेदार गंगासिग जाटचे शौर्य:*

आप्पासाहेब भोसल्यांचा चंद्रपूर येथील विश्वासू किल्लेदार होता. तो जातीने जाट व त्याचे आडनांव दिघ्वा होते. या परीसरात त्या काळी जाटांची बरीच वस्ती होती. त्यामुळे या व्दाराचे नाव जटपुरा पडले होते.20 मे 1818 रोजी इंग्रजांनी पठाणपुरा गेटकडुन चंद्रपूरात प्रवेश केल्यांनतर चंद्रपूर शहरात जिकडे तिकडे हातघाईची लढाई सुरू झाली. इंग्रज फौजा चंद्रपूर शहरात आत किल्लेदार गंगासिंग जाट यांचे घरापर्यत पोहचल्या. येथे मराठा-इंग्रज सैनीकांत तुंबळ युध्द सुरू झाले. गंगासिह विराप्रमाणे लढत होते मात्र ते जख्मी झाले. जख्मी झाल्यावर गंगासिगने विष प्राशन केले, कारण कैद केल्यानंतर इंग्रज शिक्षा करतील, असे त्यास वाटले. तसेच मरण्याआधी तिकडे अलीखांन तोपची या गोलदांजाने मेजर कोरहॅम या इंग्रज अधिकारयास मारले. त्यामुळे गंगासिहला आंनद झाला. त्यांने जायबंदी स्थितीतही अलिखान ला बोलावून त्याच्या शौर्याबदद्ल त्यास योग्य बक्षीस दिले. त्यांनतर गंगासिहांने प्राण सोडला. गंगासिगच्या शौर्यावर खुष होऊन इंग्रजांनी त्याचे राहते घर कायम ठेवले व त्याच्या कुंटुबांत नेमणुका बांधुन दिल्या होत्या असे इतीहासात नमुद आहे.

या युध्दात बिनबा गेट वर ‘बिनबा माळी जमादार’ बिनबा गेटच्या संरक्षणार्थ कामास आले, अंचलेश्वरच्या वेशीवर ‘भानबा जमादार’ कामास आले. यापैकी गंगासीग यांची समाधी जटपूरा गेट बाहेर तर इंग्रज अधिकारी मेजर कोरहॅम यांची समाधी पठाणपुरा गेट बाहेर पाटील यांच्या फुलांच्या वाडीत आजही आहे. त्यावर तत्कालीन युध्दाचा उल्लेख सुध्दा आहे. या युध्दात इंग्रजांच्या युध्दात चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटवर प्रथम इंग्रजांचा ‘युनीयन जॅक’ फडकला आणी चंद्रपूर चा किल्ला आणी राज्य ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. 20 मे 1818 ला झालेल्या या ऐतीहासिक घटनेस आज 200 वर्ष पुर्ण होत आहे.

*गोंडकालीन इतीहासातील चंद्रपुर किल्लाबाबत आख्यायीकाः*

अंचलेश्वर मंदीराच्या कुंडातील पाण्यामुळे गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा यांचावर उपचार झाल्याने ते नेहमी अंचलेश्वरच्या दर्शनाला येत असे. एके दिवशी परत जात असताना एका झुडुपातुन पांढरा शुभ्र ससा बाहेर पडला, त्याचे मस्तकावर चांदवा होता. त्याच्यावर राजाच्या शिकारी कुत्रांने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण सशाने अविर्भाव बदलविताच कुत्रा पळत सुटला, ससाही त्याचा सारखा पाठलाग करू लागला. राजाला आश्चर्य वाटून त्याने आपला घोडा त्याच्या बरोबरीने पळविला. वळणे, वळसे घेत घेत ही ससा-श्वानांची झंुज पूर्वस्थळी येऊन पोहचली. श्वान उलटला व सशास ठार केले. ही चमत्कार राजाने राणी हिताराणीस कथन केली. राणी हिताराणी ही हुशार असल्यामुळे राज्यकारभारात राजांस मदत सुध्दा करायची. या घटनेस दैवी संकेत मानुन त्या ठिकाणी किल्ला बांधुन राज्य हलविण्याची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेचे चिरस्मारक म्हणजे चंद्रपूरचा भव्य किल्ला होय. मा़त्र ज्या ठिकाणी सशास कुत्रांने मारले तिथे एक बुरूज बांधावा आणि हे बुरुज या राज्यास धोकादायक असेल. हा बुरुज अशुभ बुरूज नावाने ओळखला जातो, अशी आख्यायीका गोंडकालीन इतीहासात आहे. आणि इंग्रज युद्धात हेच बुरुज पाडून 20 मे 1818 रोजी इंग्रज सैनिक चंद्रपुर शहरात घुसले होते।

गोंड़राणी हिताराणीच्या सुचनेनुसार ससा-कुत्रांच्या मागे घोडाचे टाप नुसार किल्ला बांधण्यास तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ तेलसिंग ठाकुर राजपूत याच्या दृष्टीतुन चंद्रपूरचा किल्लाच्या पाया घातला गेला. तो पुढे सहाव्या वंशजाने पुर्ण केला. किल्लाचे बांधकात सतत 100 वर्षे पेक्षा अधिक काळ सुरू होते. साडे सात मैल लांबीचा व 15-20 फुट उंचीचा हा परकोट बांधण्यास तेव्हाच्या काळात सव्वा कोटी खर्च आले, असे चंद्रपूरच्या इतीहासात नमूद आहे.

पंरतु चंद्रपूर शहराची भौगोलीक रचन बघता या शहरास दोन्ही बाजुन झरपट व इरई नदीन वेढलेले आहे. पावसाळयात पुरपरीस्थीती निर्माण झाली की आजही शहरात पाणी शिरते तेव्हा परकोट नसल्याने हे संपुर्ण शहर पाण्याखाली राहत असावे, त्यादृष्टीने सुध्दा किल्ला-परकोटाचे महत्व चंद्रपूर शहराला आहे. तसेच ब्रिटीश काळात आलेल्या मोठ-मोठया पुरांच्या नोंदी पठाणपुरा गेट व विठोबा खिडकीवर आजही बघायला मिळतात.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here