Pratikar News
May 20, 2021
By
Nilesh Nagrale
नागपूर ः कोरोनामुळे लॉकडाउन (Corona Lockdown) लागल्यानंतर एका भाजीविक्रेत्या महिला बेरोजगार झाली. घरातील आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर तिने चक्क सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरू केले. १५ वर्षांच्या तीन मुलींसह एका तरुणीला घरी बोलावून आंबटशौकीनांना शारीरिक संबंधासाठी उपलब्ध करून देणे सुरू केले. या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा घालून महिलेला अटक केली. अर्चना शेखर वैंशपायन (४०) असे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. (Nagpur police arrested woman in illegal racket)
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना वंशपायन हिला पती आणि मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होती. कोरोनामुळे लॉकडाउन झाले. त्यामुळे भाजीविक्रीचा व्यवसाय बंद पडला. आर्थिक स्थिती बिघडली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तिने सेक्स रॅकेट सुरू केले. फक्त १५ वर्षे वय असलेल्या तीन मुलींसह एका २२२ वर्षीय तरुणींना तिने जाळ्यात ओढले. बेरोजगार असलेल्या मुलींना झटपट पैसे कमविण्याचा फंडा सांगितला.
गरीब असलेल्या मुलींनीही घरातील खर्च भागविण्यासाठी होकार दिला. अर्चनाने वाठोडा हद्दीत मोतीलालनगर येथे ८ हजार रुपये किरायाने घर घेऊन सेक्स रॅकेट सुरू केले. आंबटशौकीन ग्राहकांकडून दोन ते तीन हजार रुपये घ्यायची. त्यापैकी पाचशे रुपये पीडित मुलींना देऊन उर्वरित पैसे स्वत: ठेवून घेत होती. या सेक्स रॅकेटवर अल्पवयीन मुली असल्याने आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी होती. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना समजताच पथकाने कारवाई करीत अर्चनाला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवी नागोसे, पोलिस उपनिरीक्षक मंगला हरडे, कर्मचारी संदीप चंगोले, महिला शिपाई प्रतिमा यांनी केली.
असा झाला सौदा
सोमवारी दुपारी पोलिसांनी आपल्या पंटरला अर्चनाकडे पाठविले. दोन हजारात सौदा झाल्यानंतर त्याला १५ वर्षाची मुलगी दाखविण्यात आली. खोलीत जाताच पंटरने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी या अड्डयावर धाड टाकली. २२ वर्षीय तरुणी आणि तीन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शाळकरी मुली अडकल्या
पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या तीनही मुली १५ ते १६ वर्षांच्या आहेत. त्यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. दोघींच्या आईवडिलांमध्ये पटत नसल्याने अर्चनाच्या नादी लागल्या. एका मुलीची आई पतीसोबत पटत नसल्याने प्रियकरासोबत राहत आहे. दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी ती अडकली. २२ वर्षीय तरुणी ही मेहंदी काढण्याच्या कामाला जात असल्याचे सांगून फक्त मौजमजा आणि पैसे कमविण्यासाठी सेक्स रॅकेटकडे वळली आहे, अशीही माहिती आहे.