*रब्बी हंगामातील मका व धान खरेदी तात्काळ सुरू न केल्यास २५ मे पासून मोठे आंदोलन*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*राममोहनपुर येथील शेतकऱ्यांचे आमदार डॉ देवरावजी होळी यांना मका खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन*
*मा.जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक कार्यालय यांनी ३० एप्रील पर्यंत खरेदीची मुदत देवून सुध्दा जिल्ह्यात अजूनपर्यंत एकही मका खरेदी केंद्र सुरू झाले नाही*
*राज्य सरकारने तातडीने मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे*
सुखसागर झाडे:- मा. जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ यांनी रब्बी हंगामातील मका व धान खरेदी करिता 30 एप्रिल पर्यंत मुदत देऊन सुद्धा जिल्ह्यात एकही मका खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आले नाही तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांची धान खरेदी सुध्दा ऑनलाईन न झाल्याने त्यामुळे जिल्ह्यातील मका व धान उत्पादक शेतकऱ्यांवर फार मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे शासनाने तातडीने मका व धान खरेदी करिता केंद्र सुरू न केल्यास २५ मे २०२१ पासून शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल असे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका व धानाचे उत्पादन झाले. उप प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली व मा. जिल्हाधिकारी यांनी मका व धान खरेदी करिता 30 एप्रिल पर्यंतची मुदत दिली परंतु जिल्ह्यात एकही मका खरेदी केंद्र सुरू केले नाही.ख त्यामुळे शेतकऱ्यांना आपला मका विक्री आला नाही. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन न झाल्याने नोंदणी झाली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्य सरकारला केली आहे.
राममोहनपुर येथील मका शेतकऱ्यांनी जवळपास पल १५ लक्ष रुपयाचे सहज खर्चातून शेतमाल साठवणुकीसाठी गोडाऊन बांधकाम केले आहे. त्यामुळे मका विक्री झाल्यानंतर ते ठेवण्यासाठी गोडाऊन देखील आहे परंतु शासनाने तेथेसुद्धा खरेदी केंद्र सुरू केलेले नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. यावरून राज्य सरकार शेतकऱ्यां च्या विरोधात भूमिका घेत आहे हे दिसून येते. त्यामुळे राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास २५ मे पासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असेही आमदार डॉ देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.