Home Breaking News आणि बापाचा मारेकरी मुलगाच निघाला,,,रेल्वेने कटून मेल्याचा मुलाने केला देखावा,, 24 तासात...

आणि बापाचा मारेकरी मुलगाच निघाला,,,रेल्वेने कटून मेल्याचा मुलाने केला देखावा,, 24 तासात गुन्ह्याचा शोध,,मुलाला घेतले ताब्यात…

1321
0

आणि बापाचा मारेकरी मुलगाच निघाला,,,रेल्वेने कटून मेल्याचा मुलाने केला देखावा,,
24 तासात गुन्ह्याचा शोध,,मुलाला घेतले ताब्यात?
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

आज दिनांक 19 मे रोजी सकाळी राजुरा तालुक्यातील सिंधी गावानाजिक रेल्वे रुळावर गावातील तिरुपती तातोबा धानोरकर ( वय -43 ) यांचा मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढडुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती .

घटना लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा मर्ग विरूर पोलीस ठाण्यात दाखल केला तक्रारीवरून विरुर पोलिसांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या सूचनेनुसार विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किष्णा तिवारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ मोका पंचनामा करत तपासाची चक्रे फिरविली, प्रथमदर्शनी ही रेल्वेत कटून मृत झाल्याची घटना दिसत असली तरी मृत शरीराच्या निरीक्षणावरून घातापाताची दाट शक्यता समोर आल्याने काही संशयितांना पोलिसी धाक दाखवताच आरोपीकडून धक्कादायक खुलासा उघडकीस आला
शेती विकल्यानंतर मुलगा निखिल धानोरकर आणि वडील तिरुपती धानोरकर यांच्यात पैश्यावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन मुलाने बैलबंडीच्या उभारीने वडिलांचे डोक्याला जबर मार दिला यात वडिलांचा मृत्यू झाला प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून रात्रीच गावानजीक जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावर वडिलांचा मृत्यूदेह टाकून दिला नंतर रात्री रेल्वे त्या मृत्यूदेहावरून जाताच हात,मुंडके वेगळे झाले सकाळीच रेल्वे कर्मचारी व ग्रामस्थानी हा प्रकार दिसताच रेल्वेत कटून मृत्यू झाला असावा की आत्महत्या,किंवा खून केला असावा अशी चर्चा गावात रंगू लागली रेल्वे पोलिसांनी विरुर पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे सूचनेप्रमाणे ठाणेदार कृष्णा तिवारी,त्याचे पोलीस कर्मचारी,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोक्यावर जाऊन सविस्तर मोका पंचनामा केला निरीक्षणावरून मुलाला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता मृतकाच्याच मुलाने पैश्याच्या वादावरून आधी डोक्याला जबर मारहाण करून मृत्यू झाल्यावर रात्री मृत शरीर गावानाजिकच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकल्याचे सांगण्यात आले
त्यावरून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास विरुर पोलीस करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here