Home Covid- 19 धक्कादायक :- कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ, ...

धक्कादायक :- कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ, कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर 20 दिवस लक्षणांवर नजर ठेवण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना.

929
0

Pratikar News

कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर 20 दिवस लक्षणांवर नजर ठेवण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना.

आरोग्य वार्ता :-

भारतात कोव्हिडविरोधी लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेन्काची भारतात ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून ओळखली जाणारी लस घेतलेल्यांमध्ये रक्ताची गाठ झाल्याचं दिसून आलं.

लशीच्या साईड इफेक्टचा अभ्यास करण्यासाठी केंद्राने एक समिती गठित केली आहे. या समितीने आरोग्य मंत्रालयाला आपला रिपोर्ट सूपुर्द केलाय. लशीचे गंभीर आणि अत्यंत गंभीर दुष्प:रिणाम दिसून आलेल्या 498 प्रकरणांचा या समितीने तपास केला.

कोव्हॅक्सीन लस घेतलेल्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होण्याचा प्रकार आढळून आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये, कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर 20 दिवस लक्षणांवर नजर ठेवा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर ताप येणं, अंगदुखी यासारखे साईड इफेक्ट होतात. हे साईड इफेक्ट फार गंभीर नसतात.पण, Adverse Event Following Immunization समितीच्या अभ्यासात लस घेतलेल्यांमध्ये काही दुर्मिळ परिणाम झाल्याचं दिसून आलं.

भारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताची गाठ तयार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी.

लसीकरण सुरू झाल्यानंतर को-विन अॅपवर 23,000 साईड इफेक्टच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली तर देशातील 684 जिल्ह्यातून साईड इफेक्टच्या घटनांची माहिती मिळाली. 3 एप्रिलला लशीचे 7 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले. यातील फक्त 700 प्रकरणात गंभीर साईड इफेक्ट झाल्याचं दिसून आलं.

लशीच्या साईड इफेक्टची चौकशी करणाऱ्या समितीच्या माहितीनुसार, 10 लाखांमध्ये 0.61 लोकांना याचा त्रास झाला.
केंद्रीय समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोव्हिशिल्ड लस घेतल्यामुळे शरीरात रक्ताची गाठ तयार होण्याची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात असली तरी नाकारता येत नाही.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here