Home Breaking News आठवडी बाजार सुरू करण्यासाठी त्वरित परवानगी द्यावी♦️सुधीर मुनगंटीवार

आठवडी बाजार सुरू करण्यासाठी त्वरित परवानगी द्यावी♦️सुधीर मुनगंटीवार

2
0

चंद्रपूर…

आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

*लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्‍या सचिवांचे आश्‍वासन*

राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर लागु करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्‍यांनी मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्‍याशी चर्चा केली असुन लवकरच आठवडी बाजार सुरू करण्‍यात येतील असे आश्‍वासन श्री. निबांळकर यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेले आहे.

राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर हॉटेल्‍स, मॉल्‍स, मदीरालये आदींना परवानगी देण्‍यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. 6 महिन्‍यांचा कालावधी लोटुनही अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे. 

प्रतिकार न्यूज

सम्पर्क 7038636121

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here