नव्याने काढलेल्या राशन धारकांना अन्नधान्य देण्यात यावे.
काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन.
राजुरा (ता.प्र) :– मागील वर्षांपासून कोविड १९ ह्या महामारीमुळे संपूर्ण जनता भयभीत आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात पहायला मिळत आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. अशा वेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक गरजूंना राशनचे अन्नदान आधार ठरू शकते. त्यामुळे सण २०२० – २०२१ या कालावधीत नवीन राशन कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा. जेणेकरून उपासमारीने त्यांचा बळी जाणार नाही. अशी मागणी ओबीसी विभाग काँग्रेसच्या वतीने राजुराचे तहसिलदार हरीश गाडे यांना देण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, खामोनाचे माजी सरपंच कवडू पाटील सातपुते, माजी सरपंच लहू चाहरे आदी उपस्थित होते.