Home आपला जिल्हा कोरोना काळात हॉस्पिटल मधील रूग्णांना प्रिया खाडे यांचा मदतीचा हात – रिपब्लिकन...

कोरोना काळात हॉस्पिटल मधील रूग्णांना प्रिया खाडे यांचा मदतीचा हात – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या वतीने फळवाटप

20
0

प्रतिकार न्युज

१५ मे २०२१

चंद्रपूर(निलेश नगराळे)

चंद्रपूर येथील ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव करून कोरोना काळात हॉस्पिटल मधील रूग्णांना प्रिया खाडे यांचा मदतीचा हात पुढे करून त्यांना फळवाटप करण्यात आले

आज १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कोवीड हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयातील पेशन्ट यांना फळवाटप करण्यात आले हा उपक्रम १४ मे पासून सुरु झाला असून तो १० दिवस सतत रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रोज संध्याकाळी फळवाटप करण्यात येणार आहे.

फळवाटप मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रिया खाडे, जिल्हाध्यक्ष, कविता महाजन, उपाध्यक्ष, कविता पिंपळकर, प्रतिकार न्युज डिजिटल मीडिया चे निलेश नगराळे, विदर्भ प्रमुख भूमिका घेत सर्वांना सोबत घेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

सर्व रुग्णांनी त्यांचे आभार मानले तसेच १० दिवस हा उपक्रम सुरू राहणार म्हणून सरकारी हॉस्पिटल मध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे समजते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here