Home Breaking News भद्रावती : नागमंदिर ते विंजासन रस्त्यावरचे खड्डे त्वरीत बुजवा

भद्रावती : नागमंदिर ते विंजासन रस्त्यावरचे खड्डे त्वरीत बुजवा

3
0

(भद्रावती प्रतिनिधी ) चौकातून विंजासन वस्तीकडे जाणा-या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे ते त्वरीत बुजवावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक सुशील देवगडे यांनी केली आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे अनेकदा अपघातही झाले आहेत.या रस्त्याने विंजासन,कुनाडा,देऊरवाडा,एकता नगर वसाहत,वेकोलि माजरी येथे नागरिकांना नेहमी ये-जा करावी लागते.या रस्त्यावर विशेषत घोडमारे लाॅनजवळ खुप खड्डे पडलेले आहेत.या रस्त्यावरील सर्व खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अन्यथा त्या खड्डयात वंचित बहुजन आघाडीतर्फे बेशरमाची झाडे लावुन आगळे-वेगळे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही सुशील देवगडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here