Home राष्ट्रीय वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते...

वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते….

162
0

वामन तबाजी कर्डक
जन्म: १५ ऑगस्ट, इ.स. १९२२ – मृत्यू:१५ मे, इ.स. २००४
वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध,
हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत…
वामन कर्डक
जन्म:१५ ऑगस्ट,१९२२
देशवंडी, ता.सिन्नर, जि.नाशिक
मृत्यू:१५ मे, २००४ (वय ८१)
टोपणनावे- वामनदादा
नागरिकत्व- भारतीय
पेशा -कवी (शाहीर)
ख्याती- कवी, शाहिर
धर्म- बौद्ध धर्म
पत्नी- अनुसया शांताबाई
अपत्ये – मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
वडील- तबाजी कर्डक
आई- सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक -सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)
लोकशाहीर वामन कर्डक यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला…
तत्वाची जाण असती,
बिनडोक लोक नसते.
सारे चलन तयांचे,
ते रोखठोक असते.!!
असे रोखठोकपणे आणि ठणकावून सांगून समाजाला खरा आरसा दाखविणारे…
“आंबेडकरी विचारधारा ही धगधगती मशाल आता आमच्या हातात असून आम्ही मर्दाचे बच्चे ही भिमक्रांतीमशाल कदापि विझू देणार नाही.आंबेडकरी विचार हा तळागाळातील तमाम हीनदीन-आदिवासी-शोषित-पीडित-वंचित आणि उपेक्षितांचा आहे. ह्या आंबेडकरी विचारात इतके प्रचंड सामर्थ्य आहे की ते इथल्या जात्यंध/धर्मांध/ विषमतावादी प्रतिगामी शक्तींच्या विरोधात लढण्याचे एकमेव प्रभावी भिमहत्यार आहे की जे तलवार किंवा बंदुकांपेक्षा अधिक ताकदीचे आहे.परमाणू बॉम्ब पेक्षाही आंबेडकरी विचार प्रतिगाम्यांचा विध्वंस करण्यास सामर्थ्यवान आहे.” आणि हीच आंबेडकरी विचारांची महान ताकद आपल्या महान लेखणीद्वारे आणि तितक्याच भारदस्त-जबरदस्त गायकीने महाराष्ट्राच्या घराघरांत नेणारे महाकवी म्हणजे आमचे लाडके वामनदादा कर्डक.
गाणं असावं तर ते फक्त वामनदादासारखं…
आज वामनदादांचा पुण्यस्मरणदिन….

प्रतिकार न्यूज परिवार यांचेकडून विनम्र अभिवादन ….

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here