Home आपला जिल्हा प्रकृती गंभीर नागपूरला हलविले शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे अपघातात गंभीर जखमी...

प्रकृती गंभीर नागपूरला हलविले शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे अपघातात गंभीर जखमी –

245
0

गदचांदुर….

शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे अपघातात गंभीर जखमी
राजुरा, वार्ताहर –
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व चंद्रपूर सहकारी बँकेचे माजी सचिव प्रभाकर दिवे यांच्या वाहनाला गडचांदूर जवळ भीषण अपघात झाला असुन या अपघातात प्रभाकर दिवे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

 

 


प्राप्त माहितीनुसार राजुरा – गडचांदूर मार्गावर असलेल्या थुटरा गावाजवळील पेट्रोल पंप जवळ ट्रक व प्रभाकर दिवे यांच्या कारची जोरदार धडक झाली. त्यात कारचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला असुन प्रभाकर दिवे यांच्या डोक्याला जबर मार लागला. चंद्रपूर येथे हलविण्यात आल्यानंतर त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले असुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे एमआरआय करण्यात येत असुन त्यानंतर त्यांच्या प्रकृती बद्दल अधिक माहिती कळू शकेल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here