Home Breaking News साथ रोग कायदा, संचारबंदीचे उल्लंघन केल्यास भविष्यात काय अडचण निर्माण होऊ शकते?

साथ रोग कायदा, संचारबंदीचे उल्लंघन केल्यास भविष्यात काय अडचण निर्माण होऊ शकते?

27
0

pratikar News

Nilesh Nagrale

ताजी बातमी – लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडले असाल आणि आपल्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण या गुन्ह्यात आपल्याला अटक जरी झाली नसेल तरी भविष्यात पासपोर्ट आणि सरकारी नोकरीत हे गुन्हे अडचण ठरण्याची शक्यता आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणे कलम 188, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम 269 आणि कलम 270 नुसार जर आपल्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याचे गंभीर परिणामही नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने ठरवले तरी हे गुन्हे सहजासहजी परत घेतले जाऊ शकत नाहीत.
पासपोर्ट मिळवताना अडचणी येण्याची शक्यता.
 
व्हिसा देखील नाकारला जाऊ शकतो.
 
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अडचण येईल.
 
खासगी बँकेत नोकरी मिळवताना अडचण येईल .
 
शिवाय काही खाजगी कंपन्या देखील आता पोलिसांचं क्लिअरन्स मागतात त्यातही अडचण निर्माण होईल.
राज्यभरात भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत सुमारे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचबरोबर 1 हजार 347 वाहन मालकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. लॉकडाउन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांना 28 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याचबरोबर 37 हजार 42 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, 96 हजार 340 वाहने जप्त करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला करण्याची 364 प्रकरणे घडली होती. या प्रकरणी 895 जणांना अटक झाली असून, पुढील न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे मंडळी विनाकारण घराबाहेर पडताना सावधान जर आपल्यावर असे गुन्हे दाखल झाले तर आयुष्यभर मनस्ताप करावा लागेल. जरी शासनाने ठरवलं हे गुन्हे मागे घ्यायचे तरी हे गुन्हे मागे घ्यायचे की नाही याचा सर्वस्वी अधिकार न्यायालयाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला गंभीरतेने घ्या घराबाहेर पडू नका.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here