Home Breaking News *⭕मैत्री त्याच्या जीवावर बेतली* *🚫ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात* ...

*⭕मैत्री त्याच्या जीवावर बेतली* *🚫ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात* *💥अपघातात चंद्रपूरचा युवक ठार*

60
0

Pratikar News

नागभीड – 12 मे ला चंद्रपूर वरून ऑक्सिजन सिलेंडर ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रात्री 2 वाजेदरम्यान नागभीड हद्दीतील कोर्धा गावाजवळ सदर चारचाकी वाहन क्रमांक MH34AV2027 च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले.
या अपघातात मागील बाजूस बसलेल्या सागर वेट्टी याच्या अंगावर सिलेंडर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालक सुशांत सोरदे हा किरकोळ जखमी झाला.

28 वर्षीय मृतक सागर वेट्टी हा नगिनाबाग येथे राहत होता, काही काम नसताना सागर हा फक्त मित्रांसोबत ब्रह्मपुरी येथे जाण्यासाठी तयार झाला मात्र तो गेला पण परत आला नाही.
वाहनचालक सुशांत सोरदे वर 279, 304 (अ) कलम 184 मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विन खेडीकर करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here