Home Covid- 19 रामपूर ग्रामपंचायत सदस्य जगदीश बुटले यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप.

रामपूर ग्रामपंचायत सदस्य जगदीश बुटले यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप.

31
0

जगदीश बुटले यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप.

राजुरा (ता.प्र) :– रामपूर ग्रामपंचायतचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीश बुटले यांच्या वाढदिवसानिमित्त रामपूर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना तसेच स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथील विद्यार्थ्यी, कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना प्रादुर्भाव बघता सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या भुमिकेतून वाढदिवस साधेपणाने व लोकोपयोगी करण्याच्या उद्देशाने जगदीश बुटले आणि मित्रपरिवारांनी हे सर्व आयोजन घडवून आणले. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या प्रसंगी रामपूर येथे ग्रा.प. चे सदस्य रमेश झाडे, कोमल पुसाटे, अजय सकिनला, विलास कोदरीपल, सतीश चैधरी, मगेश बोबडे, प्रविण बोबडे, शरद शेन्ड़े, विठठल चौधरी, अजय असुटकर, सायनाथ बोबडे, प्रतिक गर्गेलवर, रोहित नांदे, अमोल रासेकर, दत्ता मोरे, अनिकेत जमदाडे, शरद धोबे, टक्की जंजर्ला आदी उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here