Home Covid- 19 राजुरा तालुक्यातील ग्रामस्थ आणि तलाठी यांचे लोकसहभागातून वरूर रोड येथे 20 बेडचे...

राजुरा तालुक्यातील ग्रामस्थ आणि तलाठी यांचे लोकसहभागातून वरूर रोड येथे 20 बेडचे विलगीकरन कक्ष सुरू*

58
0

*ग्रामस्थ आणि तलाठी यांचे लोकसहभागातून वरूर रोड येथे 20 बेडचे विलगीकरन कक्ष सुरू*

राजुरा(प्रतिनिधी)-
ग्रामस्थाच्या सहकार्यातून तलाठीचे पुढाकाराने राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे 20 बेडचे विलगीकरन कक्ष सुरू करण्यात आले. यामुळे ग्रामीण जनतेला बराच आधार मिळणार आहे.
सध्या कोरोना रुग्णांना उपचार करणे किंवा विलगीकरन कक्षात बेड उपलब्ध होत नसल्याने जीवितास धोका होत आहे ही समस्या लक्षात घेत वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम यांनी स्थानिक ग्रामस्थाना सहकार्यातून विलगीकरन कक्ष सुरू करण्याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थानी यास तयारी दर्शविली तलाठी विनोद गेडाम यांचे पुढाकारात आणि ग्रामस्थाच्या मदतीने आज 20 बेड चे विलगीकरन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले यात शासनाच्या मदती शिवाय रुगणाच्या नास्ता आणि जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या विलगीकरन कक्षाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचे हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम, सरपंच संगीता कोडापे, उपसरपंच रमेश काळे, तलाठी विनोद गेडाम, ग्रामसेवक मरापे, पोलीस पाटील बंडू भोंगळे, ग्रामपंचायत सदस्य आबाजी धानोरकर, राजू धानोरकर, सोलार कंपनीचे वसंतराव वरारकर, आशा वर्कर रंजना नगराळे, आरोग्य सेविका मरापे, गेडाम, ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here