Home आपला जिल्हा गदचांदुर शहरावर प्रदुषणाची चादर👈 👇अंमलनाला प्रकल्प साकार झाला! हा प्रकल्प पर्यटकांना सारखा...

गदचांदुर शहरावर प्रदुषणाची चादर👈 👇अंमलनाला प्रकल्प साकार झाला! हा प्रकल्प पर्यटकांना सारखा खुणावतोय!!!! खुणावतोय.

64
0

👉शहरावर प्रदुषणाची चादर👈
👇अंमलनाला खुणावतोय👇

महाराष्ट्राच्या टोकावरील घनदाट जंगल व्याप्त चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर वसलेलं इवलसं गाव – – – – – खनिज संपदेने संपन्न व विलोभनीय सौंदर्याने नटलेल्या गडांच्या रांगांनी वेढलेलं गांव – – – – – – आनंद व सुखाची भूक शमविण्यासाठी सौंदर्याची खाण असलेलं गांव – – – – – – रंगीबेरंगी लता व बहरलेल्या हिरव्याकंच भव्य वृक्षांनी आच्छादित गड ते गाव – – – – – गडचांदुर – – – – – – गडचांदुर!
मोठमोठ्या पहाडाच्या रांगा व त्या रांगामध्येच आदिवासी व गरीबांच्या वस्त्या!!!! व या सा-या वस्त्यांच्या मुलभूत गरजा भागविणारे गांव गडचांदुर – – – – – –
स्थानीय लोकांपेक्षा इतर राज्यातील लोकसंख्या जास्त असलेलं विलक्षण गांव गडचांदुर!!!!!!
अन्य राज्यातील लोकांनाही सामाऊन घेणारं उदार अंत:करण असलेलं गांव गडचांदुर – – – –
बहुसंख्य लोक आपआपले राज्य व गावे सोडून कारखान्यामध्ये नोक-याकरीता आलेले——-आपल्या मातीचा सुगंध व कुटुंबियांचे प्रेम व सुरक्षित भावना गावीच ठेऊन पोटाची भूक शमविण्यासाठी येथे धावत आहेत या धावणा-यांना सामाऊन घेणारं गाव गडचांदुर!!!
प्रदुषणाची चादर अखंड अंगावर हसत ओढत असणारं सहनशील गांव गडचांदुर!!!!!
तहसील होण्यास सर्व आवश्यक निकष व कसोट्यांना पात्र असतांनाही तहसील दर्जा नसलेले गांव गडचांदुर – – – – गडचांदुर
#अंमलनाला – – – – – ब्रिटिशांच्या कल्पकतेने गडचांदुरला अंमलनाला प्रकल्प साकार झाला! हा प्रकल्प पर्यटकांना सारखा खुणावतोय!!!!
अनेक गडांचा तटासारखा वापर करुन हा भव्य व आकर्षक प्रकल्प गडांच्या गराड्यात शोभून दिसतो!!! #सौभाग्यवतीचा कंठमणीच जणू!!!
अंमलनाला प्रकल्पाने गडचांदुर नावारुपास आले——–अंमलनाला प्रकल्पाचे सौंदर्य बघुन नयनसुख प्राप्त होते! नयनही सौंदर्य तृप्तीने पाणावतात! मन विभोर होतं—–मन भाराऊन जातं—–आनंद, धन्यता व कृतज्ञता या संमिश्र भावनांनी मन आनंदाने दाटून येते—-आनंदाचे भरते येते———
पावसात तर वेस्ट वेअर देखील बघ्यांच्या गर्दीने तुडूंब ओसंडून वाहतो!! मनमुराद आनंद लुटतात हौसीजन———-—–———
पर्यटकांसाठी पर्वणीच – – – आनंदाची—सौंदयाची———
आदिवासी बहूल अशिक्षीत, गरीब शेतक-यांना हा प्रकल्प वरदान ठरला!!! पण पुरेपुर लाभ पदरात पडण्याआधीच गडचांदुर परीसरात एक नव्हे तर चार सिमेंट उद्योगांनी उत्पादन सुरु केले! परीसर आनंदला—–गावाच्या विकासाची स्वत:च्या रोजी रोटीची भ्रांत संपली अशा मधूर स्वप्नात दंग झाले!
पण गंगेच्या पात्राने उलट दिशेने व्हायला सुरवात केली——–
आनंदावर विरजण पडले! आनंद क्षणिक ठरला!!! स्वप्न भंगले—स्वप्नांचा चकनाचूर झाला!!
सर्वच कारखान्यामध्ये परराज्यातील लोकांनी घुसखोरी केल्याने स्थानिकांचा भ्रमनिरास झाला! आंतरिक व सांस्कृतिक विकास ठप्प झाला! भावना गोठल्या!!
कारखान्यांनी प्रदुषण नियंत्रणास संयंत्र न लावताच बेधडक उत्पादन सुरु केले – – – – – कारखान्यामधून सतत बाहेर पडत असलेल्या धुरांनी परीसरातील लोकांचा श्वास गुदमरतोय!!!! फुफ्फुसाच्या आजारांनी अनेक लोक त्रस्त आहेत!!
जड वाहनाच्या वाहतुकिने व आवागमनाने प्रदुषणात दुपटीने वाढ होत आहे – – – – –
गडचांदुरचे सौंदर्य विदिर्ण होत आहे काय? विलोभनीय गडांचे विद्रुपिकरण होत तर नाही ना???
साधार भितीचे वातावरण आहे!
ब्रिटिशांच्या अविष्काराने साकार झालेला अंमलनाला प्रकल्प आहे त्याच स्थिती आजही आहे!! नैसर्गिक सौंदर्यात मानवाचा हातभार लागावा एवढेच!!!!
या प्रकल्पाच्या लगतच महादेव मंदीर स्थित आहे
पण महादेवाची पाठ प्रकल्पाकडे असल्याने महादेवही निस्तेज, उदास भासतात———–
राजकारनी व उद्योजकांनी लक्ष दिल्यास महादेवाचा कृपा प्रसाद पर्यटकांना परीसरातील लोकांना प्राप्त होऊ शकतो!!! अंमलनाला शेतकरी, मजूर, कामगार, पर्यटकांना वरदान आहे!!!!!! उद्योजकांनी अनाठायी हस्तक्षेप न केलेला बरा!!!
अन्यथा प्रकल्पालाच ग्रहण लागायचं———उद्योजकांनी पाण्याचा उपसा न करता पर्यायी व्यवस्था हिताची ठरेल!
#माणीकगड किल्ला!!!!!! आदिवासी राजाचे वैभव!!!!! आदिवासी संस्कृती, विरत्व व भव्यतेचे प्रतिक माणीकगड किल्ला!! घनदाट किर्र———जंगलानी व्याप्त उंच पहाडावर हा किल्ला आजही विरश्री उत्तेजीत करतोय!!!
माणीकगड किल्ल्याचे प्रवेश द्वार आदिवासी राजाचे शुरत्व व विरत्वाचे प्रतिक आजही दिमाखाने उभे आहे!!! प्रवेशद्वाराचे सौंदर्य व त्याची भव्यता वाखाणण्याजोगी आहे!!! विस्तीर्ण असा परीसर पिंजून काढण्याची मनिषा अनावर न झाली तरच नवल!!!! बाहूही स्फूरण पावतात———-
विस्तीर्ण परीसरात वृक्ष, वेली, पाताल विहीर, रानीमहाल, रानीचे स्नान गृह, खोल दरीतील तलाव बघण्याकरीता पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहचते———–
पर्यटकांचा पायपिटीने कसही लागतो!!!
अवर्णनीय सौंदर्य बघुन मन हरखुन जातं!!
माणीकगड किल्ल्याच्या पायथ्याशी अती प्राचीन विष्णु मंदीर!!!!!!!!!!!
अतिशय देखणं मंदीर!! कला व नक्षीकामाने नटलेलं!!! भग्नावस्थेत आलेलं मंदीर——–
पण——–देखणेपण कमी न झालेलं विष्णू मंदीर!!!!! अजानता, नकलत नतमस्तक होतात पर्यटक🙏
मंदीराच्या समोरच मोठी खोल दरी!!!!! किर्र. – – घनदाट जंगल, रानटी जनावरांची अनामिका भिती असतांनाही विलोभनीय नजारा बघतच रहावा अस्सा सुंदर नजारा!!! मती गुंग व्हावी असा नयनरम्य नजारा!!! अस्सल नैसर्गिक सौंदर्याच्या खाणी मधून आनंद उपभोगण्याकरीता पर्यटक आसुसलेले दिसतात!
आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्यास मन उद्युक्त होते नव्हे, परीसर तसे करण्यास बाध्य करतो!!!!
अंमलनाला व पकडीगुड्डम हे प्रकल्प व सौंदर्य बघावे, असेच आहे
मेटाकुटीस आलेल्या व लॉकडाऊनने सुस्तावलेल्या जीवास नवचैतन्याच्या अॉक्सीजनची लस घेण्यास अंमलनाला खुणावतोय!!! माणीकगड साद घालतोय!!

विरश्री राजाधिराज आदिवासी राजांना
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
व मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
नतमस्तक – – – – प्रा. वामनराव मत्ते

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here