Pratikar News
चंद्रपूर – वर्ष 2020 ला जगात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला बाहेर देशातील हा जीवघेणा संसर्ग भारतात सुद्धा आला, आज या संसर्गाने लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, रुग्णालयात कोविड व अन्य आजाराने ग्रस्त नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे.
सरकारद्वारे राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक कामानिमित्त किंवा विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देत आहे.
कोरोनाची बाधा झाली तर पुढे काय, घरी विलीगिकरण मध्ये रहावं की रुग्णालयात दाखल व्हावं हा मोठा पेच नागरिकांच्या मनात असतो.
राज्य सरकारने मागील वर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांच्या मनात असलेला हा पेच सोडविण्याचा प्रयत्न करीत, बाह्यरुग्ण व विलीगिकरणात असलेल्या रुग्णांसाठी सरकारने “संजीवनी” देण्याचं काम सुरू केलं आहे.
आता घरबसल्या रुग्णाला ऑनलाइन द्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार करणे सोपी झाले आहे.
शासनाने E-Sanjeevani OPD संकेतस्थळ व अँड्रॉइड एप सुरू करून नागरिकांना पूर्णतः मोफत डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मार्गदर्शनसह उपचार व गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन SMS द्वारे नागरिकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळणार.
सध्याच्या कोरोना काळामध्ये घरी राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये जर कुणालाही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर? अशा लोकांना आता घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेता येणार आहे. याकरिता शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओ.पी.डी.’ ही ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.
तुम्ही घरी संजीवनी ओ.पी.डी. अॅपद्वारे डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकता.
सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 1:45 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल.
यामध्ये एस.एम.एस.द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रीप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
सदर एप वर या द्वारे करा नोंदणी
तुम्ही घरी संजीवनी ओ.पी.डी. अॅपद्वारे डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकता.
सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 1:45 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल.
यामध्ये एस.एम.एस.द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रीप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
ई संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण https://esanjeevaniopd.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात.
अॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे अॅप (App) डाऊनलोड करता येईल.
आपला मोबाईल नंबर OTP (One Time Password) द्वारे सत्यापित (Verify) करा.
मोबाईल नंबर सत्यापित झाल्यानंतर टोकन (TOKEN) जनरेट करा.
टोकन (TOKEN) जनरेट झाल्यावर लॉग इन करा.
लॉग इन झाल्यावर तुमची माहिती भरुन तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करुन डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.
ई प्रिस्क्रिप्शन डाऊनलोड करा.
शासनाच्या या उपक्रमाला तब्बल 2100 डॉक्टरांनी आपली नोंदणी करीत नागरिकांना मोफत मार्गदर्शन करीत असून चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य आजाराने ग्रस्त व कोविड विलीगिकरण मध्ये असलेल्या रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येत आपली नोंदणी करीत या सेवेचा लाभ घेण्याची विनंती कोरोना नोडल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत यांनी केले आहे.