Home Covid- 19 चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागरिकांना गोड बातमी .कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत*

चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागरिकांना गोड बातमी .कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत*

151
0

*कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत*
बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार
चंद्रपूर दि. 10, कोविड-19 संदर्भात बेड उपलब्धता, खाजगी कोविड रूग्णालयाकडून आकारली जाणारी देयके, रूग्णालय व्यवस्था, कोविड रूग्णांवर होणारे उपचार इ. कोविड संदर्भात कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.
या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड हे सदस्य असून सहय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे हे सदस्य सचिव आहेत.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी दूरध्वनी क्रमांक 274161, 274162 व ई-मेल आयडी क्रमांक covidcon[email protected] यावर नोंदवाव्या असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here