Home Breaking News लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू

लसीकरणात माघारलेल्या गावांमध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू

14
0

Pratikar News

नागपूर दि.09 :  कोरोना वर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी लसीकरणात माघारलेली गावे व कोरोनाग्रस्त गावांना मदत करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा गावागावात उतरली असून अशा निवडक गावांमध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले आहे.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा, अरोली, कोदामेढी, रामटेक तालुक्यातील मनसर, पारशिवनी तालुक्यातील करंभाड, सावनेर तालुक्यातील बळेगाव या ग्रामपंचायतीमध्ये  आढावा बैठक घेतली. लसीकरणाने कोरोनाची गंभीरता कमी होते हे सिध्द झाले असल्याने लसीकरणावर भर दयावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी  उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना  सूचित केले.
प्रशासनाने राबविलेल्या निर्बधामुळे कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी होत आहे.आज जिल्हयात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त आहे.आज 6544 रूग्ण बरे होउून  घरी गेले तर 3104 नविन रूग्णांची नोंद झाली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here