राजुरा…
प्रतिकार न्यूज…
राजुरा तालुक्यात मागील काही दिवसात नरभक्षी वाघाने राजुरा तालुक्यातील परीसरात धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे परीसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी नुसते निवेदन देण्यात धन्यता मानत आहेत.आज मात्र प्रत्यक्षात टेंभुरवाही गावातील शेतकरी शेतमजूर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.आता पर्यंत दहा लोकांचा बळी गेला.राजुरा तालुक्यातील उद्धव टेकाम चुनाळा, मंगेश कोडापे राजुरा,श्रीहरी साळवे मूर्ती,वर्षा तोडासे खांबाला,संतोष खामनकर धानोरा,दिनकर ठेंगरे तोहोगाव,नंदकिशोर बोबडे परासोडी,वासुदेव कोंडेकर गोविंदा मडावी नवेगाव,मारोती पेंदोर राजुरा या शेतकरी,शेतमजुर. यांचा बळी गेला.वाघाला जेरबंद करा म्हणून लोकप्रतिनिधी आतापर्यंत फक्त निवेदन देत आहेत,त्यामुळे गावकरी या लोकप्रतिनिधींच्या कार्यावर नाराज असल्याचे बोलून दाखवितात,शासनाची जी मदत मिळते ती मिळवून दिली यात धन्य मानतात,पण प्रत्यक्षात मात्र वाघाच्या जेरबंद साठी निवेदन देत होते.अनेक पक्षांनी निवेदन दिलीत ,सर्वांना वन अधिकाऱ्याने,बोळवण घातली. शेती कामात शेतीवर जाताना मनात असलेली भीती यामुळे,टेंभुरवाही येथील शेतकरी शेतमजूर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले आहेत.आपले काम धंदे सोडून आंदोलन केले.एकीकडे वाघाची डरकाळी,तर दुसरीकडे रानडुक्कर या दोघांच्या. लढाईत शेतकरी शेतमजूर सापडला आहे . वाघाच्या भितीमुळे शेतीचे रक्षण करण्यासाठी कोणीही शेतात जात नाहीं, त्यामुळे रानडुक्कर शेतीचे नुकसान करीत आहेत.दोन्ही बाजूने मरण शेतकरी शेतमजूर यांचेच आहे.
Home Breaking News लोकप्रतिनिधी निवेदन देत आहेत कागदावर.🔺स्व रक्षणार्थ उतरले शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर