Home Covid- 19 गाव पातळीवर व प्रत्येक वार्डामध्ये कोरोना वरील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी...

गाव पातळीवर व प्रत्येक वार्डामध्ये कोरोना वरील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी :- राजु झोडे*

69
0

बल्लारपूर…

*गाव पातळीवर व प्रत्येक वार्डामध्ये कोरोना वरील लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी :- राजु झोडे*

कोरोना महामारीचा वाढता दर पाहता कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याकरिता प्रत्येक गावात व प्रत्येक वार्डात नागरिकांना लस देणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता लसीकरण प्रत्येक नागरिकांना देणे अत्यावश्यक आहे. खूप जास्त काळ लाकडावून ठेवल्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब, व्यापारी, मजूर वर्ग तसेच सरकारला परवडण्याजोगे नाही. करिता कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डात व प्रत्येक गावात प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवून प्रत्येक नागरिकांना लस देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. याकरिता समाज मंदिर, मंगल कार्यालय, शाळा या ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
लसीकरण मोहीम राबविण्यात दिरंगाई झाली व वरील मागणी पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजु झोडे, संपत कोरडे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here