*स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे ऑक्सिजन सिलेंडर भेट*
कोरपना :-
येथील स्टुडंट फोरम ग्रुप तर्फे डॉ. प्रवीण येरमे सर यांच्या निःशुल्क कॉविड केअर सेंटर ला गरजू रुग्णांकरिता सात ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून देण्यात आले. सध्या सर्वत्र ऑक्सिजन चा तुटवडा भासत असताना सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही मदत ग्रुप कडून करण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या ज्या वेळेस देशात आसमानी संकटे निर्माण झाले, मग तो महापूर असो, सीमेवर झालेले दहशतवादी भ्याड हल्ले असो, मागील वर्षांपासून कोरोना विषाणूने घातलेल्या धुमाकूळ असो अशा प्रत्येक संकटा समयी ग्रुप सामाजिक भान ठेऊन मदतीला पुढे येत असतो. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवनावश्यक वस्तूच्या 250 किट गोरगरीब जनतेला ग्रुपतर्फे पुरविण्यात आल्या होत्या, अशा असंख्य घडलेल्या संकटाचा वेळेस स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना मदतीला धावली आणि नेहमी धावत राहील. आज आपल्या देशात कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाची दुसरी लाट भयंकर सुनामी सारखी येऊन देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या मानेवर बसली आहे . या लाटेत इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे की, तो आपल्या विचारा पलीकडे आहे. आज ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा स्टुडंट फोरम ग्रुप मदतीला धाऊन आला आहे. ग्रुपच्या सौजन्याने डॉ. येरमे सरांनी कोरपना येथे ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन च्या नावाने सुरू केलेल्या मोफत कोविड उपचार केंद्राला चार जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व तिन लहान ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार असलेल्या ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन कोरपना तर्फे रुग्णसेवक श्री. दिनेश राठोड, श्री.संजय सिडाम, श्री.रवी मडावी यांच्या मदतीने कोविड सेंटर डॉ. प्रवीण येरमे सर यांनी सुरू केले आहे. तिथे कोरोना रुग्णावर निःशुल्क उपचार केला जात आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर जातीभेद सोडून समाज सेवा करावी हिच माझी फी , असे म्हणून डॉ. येरमे साहेबांनी समाजाची सेवा करत आहे. असे उपक्रम यशस्वी होण्यात समाजाची बांधिलकी जपणाऱ्या अदृश्य हातांचा तितकाच वाटा आहे. त्याचेही ऋण मदतीच्या ओघातून दिसून येते.
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी श्री.सुशील कुमार नायक सर(SDPO Nandafata), श्री. आबिद जी अली, श्री. किशोर जी बावणे श्री.अनिल भाऊ रेगुंडवार, श्री.अरुण भाऊ डोहे, श्री.राजुभाऊ बुऱ्हान, अॅड. श्रीनिवास मुसळे, श्री. दिवाकर जी धोटे श्री.विजय भाऊ पानघाटे, श्री. नदीम सय्यद, श्री.तुषार देरकर, श्री.दिनेश ढेंगळे, श्री.अंशुल पोतनुलवार या सर्वांनी स्टुडंट फोरम ग्रुपला सहकार्य व प्रेरणा दिल्याने हे शक्य होऊ शकल्याचे सदस्यांनी सांगितले. स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे या पुढे ही कोरोना लढ्यात आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार अशी भावना ग्रुपच्या संघटकानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून स्टुडंट फोरम ग्रुपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिकार न्यूज