Home विशेष कोविड सेन्टरच्या नावाखाली नागरीकाची लुट थांबवावी – प्रकाश अहिर

कोविड सेन्टरच्या नावाखाली नागरीकाची लुट थांबवावी – प्रकाश अहिर

12
0

श्रीरामपूर(दि.6मे):-करोना महामारीने संपुर्ण देशात हाहाकार माजविला असून त्यातच आपल्या अहमदनगर जिल्ह्यात खुप भयानक परिस्थिती निर्माण झाली असून अशा परिस्थितीत श्रीरामपूर शहरात वैद्यकीय सेवेच्या नावाखाली मोठमोठे कोविड सेंटर सुरु करून गोरगरीब जनतेची अर्थिक लुट व हेळसांड होताना दिसत आहे.एकीकडे शासनाने सरकारी यंत्रणा म्हणून उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय यांनी समिती नेमून काही अडचण आल्यास संपर्क साधवा असे आवाहन करुन देखिल शहरात कोविड सेन्टरच्या नावाखाली दुकाने मांडून बसलेल्या हॉस्पिटल वर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अशा या बहुतांशी कोविड सेन्टरला साध्या बेड व्यतिरिक्त कुठलीही सेवा दिली जात नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत कोविड सेन्टरला रुग्णांकडुन डिपॉझिटच्या नावाखाली अवाच्यासव्वा रक्कमांची मागणी केली जात आहे. अशा या परिस्थितीत जनतेला गेल्या वर्षभरापासून रोजगार धंदा नसून उदरनिर्वाहासाठी कामं नसून जनतेवर उपासमारी वेळ असतानाच अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब जनता वैद्यकीय सेवेसाठी कर्ज बाजारी होत आहे. तर दुसरीकडे पुरेसे पैसे, महागडी औषधे, ऑक्सिजन आदी वैद्यकीय सुविधा पुरेसे प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. काही कोविड सेंटर व रुग्णालये पैसे जमा केल्यावरच उपचार सुरू करीत आहेत. जर अनामत रक्कम नसेल तर जागा शिल्लक नसल्याचे सांगून दुसरीकडे हलविण्याचे सांगतात. सरकारी रुग्णालयात हे सर्वसाधारण गोरगरिबांनी व मध्यमवर्गीयांनीसाठी असताना खाजगी रुग्णालयात उपचार घ्या इथे जागा नाही म्हणत त्यामुळे नागरीकानी खाजगी रुग्णालयासाठी एवढे पैसे आणायचे तरी कुठून ?

वैद्यकीय क्षेत्रात होणारी रुग्णांची हेळसांड व अर्थिक लुट तात्काळ थांबवावी यासाठी शासनाने कडक पाऊले उचलने गरजेचे आहे व अशा लुटारुंवर कठोरातील कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असे निवेदत म्हटले आहे.
…………..
“श्रीरामपूर येथील सर्व हॉस्पिटल व कोविड सेंटर यांची चौकशी करून मरण पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांकडून, बरे झालेल्या रुग्णांकडुन तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोणत्या कोविड सेंटरने व कोणत्या रुग्णालयाने किती रक्कमेला लुटले याची चौकशी होऊन त्यांच्या वर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी- तसेच ज्या ठिकाणी पुरेसी सुविधा असेल त्याच ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेतच परिपूर्ण उपचार होणे गरजेचे आहे”. 
– प्रकाश अहिरे, उपाध्यक्ष, बहुजन समाज पाटी, श्रीरामपुर

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here