Home Breaking News संतोषभाऊ रावत यांचे नेतृत्वात,,♦️ केंद्र सरकारच्या ,शेतकरी विरोधी धोरणा विरोधात निषेध आंदोलन…

संतोषभाऊ रावत यांचे नेतृत्वात,,♦️ केंद्र सरकारच्या ,शेतकरी विरोधी धोरणा विरोधात निषेध आंदोलन…

49
0

मूल…
प्रतिनिधी…
प्रतिकार न्यूज..

♦️केंद्र सरकारच्या धोरणा विरूध्द* *निषेध आंदोलन*

मुल येथे आज दुपारी 1 वाजता *तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक *आदरणिय संतोषभाऊ रावत यांच्या नेतृत्वात* व उपस्थित, केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच कृषी व काम गार विरोधी कायदे पारीत केले. हे दोन्ही कायदे शेतकरी व कामगार विरोधी आहेत तसेच उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे मनिषा वाल्मीकी नामक युवतीवर अमानवी कृत्य करून हत्या केली. याविरूध्द आवाज उठविण्यास गेलेल्या गांधी कुटुंबीयांशी तेथील योगी सरकारच्या पोलीस प्रशासनाने धक्काबुक्की करून अपमान केला. या सर्व घटना जनतेच्या न्याय हक्कावर गदा आणणाऱ्या आहेत, त्यामुळे या सर्व निदंनिय घटनांचा विरोध करण्याठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील पक्षाच्या वतीने *सोमवार, दिनांक १२ आँक्टोबर २०२० रोजी दुपारी 1 वाजता तहसिल कार्यालय मूल समोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले व त्या बाबतची निवेदन माननीय तहसीलदार मुल होळी साहेब यांना देण्यात आले, सदर निवेदन देताना महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादि,शिवसेना यांच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, सोबतच तालुक्यातील शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, युवा वर्ग तसेच महिला वर्ग उपस्थिती दर्शविले. यांचे नेतृत्वात होणाऱ्या निषेध आंदोलनात महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणुन मोठ्या संख्येनी उपस्थित राहुन मोदी सरकारचा निषेध आणि महाविकास आघाडी सरकारला पाठींबा दर्शविले. मुल येथे तहसीलदार होळी साहेब यांना निवेदन देताना सन्मानीय श्री संजयभाऊ मारकवार, घनश्याम भाऊ येनूरकर, राकेश भाऊ रत्नावार,संदीपभाऊ कारमवार,पवन निलमवार,गंगाधरभाऊ कुणघाडकर,विजयभाऊ लोणबळे,प्रशांत गट्टूवार,विनोदभाऊ कामडि, लिनाताई फुलझले,आखीलभाऊ गांगरेड्डीवार, दीपक पा. वाढई, राजेंद्रभाऊ कन्नमवार, किशोर भाऊ घडसे शातारामजी कामडे रूमदेव गोहणे पुरूषोत्तमजी भुरसे विवेक मुत्यलवार दशरथभाऊ वाकुडकर, गुरुदासभाऊ चौधरी, राहुल मुरकुटे,तसेच मुल तालुक्यातील सरपंच तसेच उपसरपंच व काँग्रेस कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

आपण वाचा इतरांना वाचण्यास शेअर करा.

7038636121 सम्पर्क

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here