Home आपला जिल्हा राजुरा पत्रकाराला निमकर भाऊंनी एप्रिल फूल बनविले,! उपोषण करणार नाहीत हे सर्वांना...

राजुरा पत्रकाराला निमकर भाऊंनी एप्रिल फूल बनविले,! उपोषण करणार नाहीत हे सर्वांना माहीत होते ,उपोषण करणे सर्वाचे काम नाही ….

371
0

राजुरा…

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरोणा बाबत उपोषण करणार गुन्हा दाखल झाला तरी चालेल ,अशा प्रकारच्या फुस्क्या बांब सारखे ,लहान मुलाचे बाहुलीच्या लग्न सारखे प्रकार भाऊंनी करू नये,वृत्तपत्रात किती प्रसिध्दी मिळाली पत्रकार सुध्दा खुश होते ,एक लोकप्रतिनिधी जनतेसाठी उपोषण करतात ,पण काय सर्व हवाच निघून गेली .यात पत्रकार यापुढे भाऊवर कसा विश्वास ठेवणार भाऊ ,दोन दिवस तरी बसला पाहिजे होते.

सर्व पेपर ला बातम्या आल्या. जिल्ह्यातून या उपोषणाची दखल घेतली गेली. यामागे राजकिय हेतू नसल्याचे सांगण्यात आले. प्रसिद्धी साठी हे आंदोलन नसल्याचे प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट करण्यात आले. गुन्हा दाखल झाला तरी उपोषण करणारच, असे घोषित करण्यात आले….. आता व्यवस्थेत कोणता बदल झाला, काय मिळाले, म्हणुन एकदम उपोषण मागे घेण्यात आले.
अधिकारी तर सर्वानाच म्हणतात की सहकार्य करा, हे काही नवीन नाही. मग एवढा गाजावाजा केलेले उपोषण आंदोलन मागे का घेण्यात आले. एकतर आंदोलन घोषित करण्यापुर्वी सर्वंकष विचार करून, अभ्यास करून आंदोलनाची घोषणा करायला हवी होती. मग हा केवळ प्रसिद्धीचा फार्स होता, असे कुणी म्हंटले तर त्यात वावगे काय ?
….यामुळे माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांची जी प्रतिमा अनेकदा पक्षांतर केल्यामुळे व धरसोड वृत्तीमुळे तयार झालेली आहे. त्याला या आंदोलन मागे घेण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. त्यांनी एक दिवसाचे आंदोलन केले असते तरी ते त्या प्रतिमेला छेद देणारे ठरू शकले असते. परंतु पुन्हा एकदा आपल्याच तथाकथित भूमिकेवर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे…..तूर्त एवढेच.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here