Home Breaking News महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा – आमदार जोरगेवार यांची...

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा – आमदार जोरगेवार यांची मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी

16
0

Pratikar News

मे ०४, २०२१

 

चंद्रपूर – संपूर्ण विश्व आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने ग्रसित असून रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे. यामुळे लाखो लोकांचे बळी गेले आहेत. सर्वात जास्त झळ ही महाराष्ट्राला बसली असून, शासन मोठ्या प्रमाणात त्यासाठी अहोरात्र उपाययोजना करीत आहे. या लॉकडाऊनच्या कार्यकाळात आपल्या देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस बांधव, सरकारी कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी हे ‘कोरोना योद्धा’सारखे कार्य करीत आहेत. मात्र, यामध्ये मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिजे ते स्थान देण्यात येत नाही. घरबसल्या देशातील कोट्यवधी जनतेला खरी माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनच मिळत आहे. त्यामुळे आपल्या जिवाशी खेळून या खऱ्या बातम्या एकत्रित करून त्या लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या पश्चिम बंगाल व मध्यप्रदेश शासनाने तेथील पत्रकारांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांना सुध्दा ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करावे असे मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्राद्वारे केलेली आहे.

सोशल मीडियातून जरी लोकांना देशात आणि जगात काय चालले आहे हे समजत असले तरी खऱ्या बातम्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत. मात्र, या महत्त्वाच्या बातम्यांसाठी देशातील असंख्य पत्रकार, वार्ताहर, वृत्तपत्राचे प्रतिनिधी,उपसंपादक, संपादक मंडळ, वरिष्ठ संपादक मंडळ आणि तंत्रज्ञ अपार कष्ट घेत आहेत. अचूक व निष्पक्ष बातमी मिळविण्याकरिता सतत प्रवास व कोरोना बाधित क्षेत्रातून पत्रकारिता करावी लागतात. आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता अशावेळी देशाच्या सेवेसाठी आणि देशवासीयांना योग्य अचूक माहिती देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. आपले कर्तव्य पार पडतांना काही पत्रकारांना कोरोना विषाणूची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडले आहे. असेही या पत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामध्येही सर्वच क्षेत्रातील पत्रकार 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावे आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी या महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करून कोरोना योद्ध्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पत्रकार बंधूंना लागू कराव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here