चंद्रपूर ।।।।
प्रतिनिधी
♦️ हाती सोयाबीन येण्या आधी पाण्याने घात केला .
♦️उरल्या सुरल्या नजरा व्यापारी यांचे कडे वळल्या ।
चंद्रपूर जिल्ह्यात या वर्शी कापूस ,सोयाबीन चे पेरे चांगले झाले .राज्यात सर्वत्र मोठं मोठे पूर आले मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग मात्र या पुरातून वाचला होता,काही तालुक्यात अति वृष्टीमुळे धान,सोयाबीन ,कापूस पिके नष्ट झाली ,पिके तर गेली पण त्या बरोबर निवारा सुद्या अतिवृष्टी मुळे फक्त उरले होते अंगावरचे कपडे,पूरग्रस्त लोकांना मदतीच्या नावाखाली आम्ही फोटो काढण्यात मागे राहिलो नाही.फोटो काढून आम्ही एक प्रकारची प्रसिद्धी मिळविली असं वाटू लागलं आहे.आठ ,पंधरा दिवस सर्व लोक गावात भेटी देत असत ,आता मात्र पता नाही संपली जबाबदारी असे आम्हच्या समाजाची रीत,ज्या कुटूंबाच सर्व पुराण वाहून नेलं त्याचा कोणीतरी विचार करतो का !वेळ मिळाला तर ना,आता परतीच्या पावसाने होत नव्हतं सर्व साफ करत गेलं.अनेकांचे सोयाबीन कापनीला आहे पण पाऊस काही ,वेळ देत नाही,ज्यांनी सोयाबिन कापून ठेवले त्याला कोंब फुटतील ,जास्त ऊन लागली की शेंगा फुटतील आणि एवढं सर करून मग शेवटी विक्री करायची असते,आता ओल सोयाबिन विक्री साठी व्यापाऱ्याच्या दारात शेतकऱ्याना जाण्याची वेळ आली,ज्याला शेतातील झाड ओळखता येत नाही तो व्यापारी शेतकरी बांधवाच्या सोयाबीन चा भाव करणार आहे,शेतीची मशागत,बिजाई,पेरणी,निंदाई, खत खरेदी,खत देणे ,फवारणी,डावर्ण ,कापणी ,मळणी यंत्र,सोयाबीन काढणी,असा खर्च काढला तर,शेतकऱ्याच्या खिशातून पैसे जातात,बाजार मंडित व्यापारी ,बोली बोलताना एक रुपयांपासून बोली बोलतात ज्यांना जेवढा माल घ्यायचा तेवढा घेतली की तो शांत बसतो ,दुसरा ,तिसरा चौथा अशा प्रकारे सर्व व्यापारी शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही.आता राहिला चुकारा,पैसे तुम्हचेच पण आता नाही ,थोडेफार घेऊन जा काम निभव म्हणून बोळवण करणारे,व्यापारी,यांची ओळख निर्माण झाली आहे. अर्धा माल तर घरीच खरेदी करतात ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे, दुर्लक्ष मूळे ओल्या सोयाबीन विक्री करताना शेकऱ्याच्या नजर आता व्यापारी बांधवाकडे फिरली आहे.