Home आपला जिल्हा सास्ती धोपटाला परिसरातील इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी…

सास्ती धोपटाला परिसरातील इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी…

47
0

डायमंड इंडेन गॅस गोदामातून गॅस सिलिंडरची चोरी
राजुरा, वार्ताहर –
राजुरा तालुक्यातील सास्ती रस्त्यावरील धोपटाला गावाजवळ असलेल्या इंडेन गॅस गोदामाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी वीस हजार रुपये किमतीच्या एकूण सहा भरलेल्या गॅस सिलिंडरची चोरी केली. दिनांक एक मे ला सायंकाळी सात ते आठ च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
धोपटाला कामगार सहकारी पतसंस्थेच्या डायमंड इंडेन गॅस एजन्सीचे धोपटाला गावाजवळ गोदाम आहे. दिनांक 1 मे ला रात्री आठ च्या दरम्यान रस्त्यावरुन जात असतांना एका कोळसा खाण कामगाराला गोडाऊनचे प्रवेशद्वार उघडे दिसले. म्हणुन त्यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष रंगराव कुलसंगे यांना माहिती दिली. ते त्वरित गोडाऊन येथे आले असतांना समोरचे प्रवेशद्वार व आतील गोडाऊनचे दार उघडे दिसले. दोन्ही कुलूप तोडून समोरच्या बाजूला पडलेली होती. गोडाऊन किपरने संपूर्ण सिलेंडरची मोजणी केली असता पाच घरगुती वापरायचे सिलेंडर,( 14.2 किलोग्राम ) आणि एक 19 किलोग्राम व्यावसायिक सिलेंडर चोरीला गेल्याचे उघड झाले. याची किंमत वीस हजार रुपये आहे.
संस्थेचे अध्यक्ष रंगराव कुलसंगे यांनी त्वरित राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या गोडाऊनच्या जवळ एका चारचाकी वाहनाचे टायर आढळून आले. चोरटय़ांनी चार चाकी गाडीतून हे सिलेंडर चोरी केले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा पोलिसांनी भादंवि कलम 461 व 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here