Home Covid- 19 कोरोना महामारी– प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे क्रांतिकारक आणि मानवतावादी...

कोरोना महामारी– प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे क्रांतिकारक आणि मानवतावादी कार्य*

108
0

नागपूर …

*कोरोना महामारी– प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे क्रांतिकारक आणि मानवतावादी कार्य*

*कोविडशी देण्या लढा,*
*दीक्षाभूमीने उचलला विडा।*

नागपूर –

*संपूर्ण भारतात कोरोना महामारीने हाहाकार माजविलेला आहे. त्यामुळे प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. 01.05.2021 पासून दीक्षाभूमी नागपूर येथे भारतीय जनतेसाठी OPD कोविड सेन्टर चालू करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी प्रमाणे मानवतावादी व क्रांतिकारी कार्य हाती घेण्यात आले आहे*

समस्त भारतीयांना कळविण्यात येत आहे की, देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आणि समता आरोग्य प्रतिष्ठान यांचा संयुक्त पुढाकाराने दीक्षाभूमी येथे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने दिनांक 01.05.2021 पासून परमपूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभहस्ते आणि समितीचे सचिव आयु.डॉ. सुधीर फुलझले, डाॅ.महेंद्र कांबळे, ऍड. स्मिता कांबळे, आयु. विश्वास पाटील, ऍड. आकाश मून आणि निवडक समता सैनिक यांच्या उपस्थितीत निशुल्क OPD कोविड सेन्टरची स्थापना करण्यात आली असून *काही दिवसातच संपूर्ण यंत्रनेने सज्ज अशा दीक्षाभूमी OPD कोविड सेन्टरची सुरवात केली जाईल*

*या OPD कोविड सेंटरची वेळ दररोज दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहील.*

ह्या ओपीडी कोविड सेंटर मध्ये निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागपूर आणि परिसरातील ज्या व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत आणि ऑक्सिजन लेव्हल 92-97 आहे. त्यांनी *दीक्षाभूमी OPD कोविड सेन्टरचा* अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले, सदस्य डॉ राजेंद्र गवई, अॅड मा मा येवले, एन आर सूटे, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, डी जी दाभाडे यांनी केली आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here