Home Breaking News माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला...

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल ,

111
0

Pratikar News

 

Akola:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात परत एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा अट्रॉसिटी अक्टसह विविध 22 कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल झाले आहेत.  हे प्रकरण आता ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची 14 पानी तक्रार पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमवीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व अन्य 27 यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी अक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here