Home Covid- 19 रेती तस्करांना मोकळीक असलेल्या राजुरा शहरात पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार राजुरा...

रेती तस्करांना मोकळीक असलेल्या राजुरा शहरात पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार राजुरा तालुक्यातील समस्या बाबत दौऱ्यावर…

120
0

राजुरा …

 

 आज  पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका दौऱ्यावर…

 

 

जिल्ह्याचे पालकमंत्री 27 एप्रिल पासून चंद्रपूर दौऱ्यावर आले असून ,आज त्यांचा राजुरा शहरात ,रेती तस्कराच्या शहरात आगमन होत आहे, कोरोना बाबत असलेल्या समस्या ,लसीचा तुटवडा आणि ग्रामीण भागात तापाची साथ ,अपुरा आरोग्य विभागातील कर्मचारी वर्ग, कोविड सेंटरला भेटी आढावा घेणार असल्याचे समजते ,मात्र राजुरा तालुक्यात रेती तस्करांनी रेती चोरी करण्यात धुमाकूळ घेतला मात्र महसूल विभाग निव्वळ पाहत असल्याने ,महसूल विभागाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याचे पहावयास मिळत आहे, आज पालकमंत्री रेती तस्करी वर ठोस निर्णय घेते की काय याकडे जनते चे लक्ष लागले आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार दि. 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील.सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहतील.
दुपारी 12:15 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. दुपारी 12:30 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत कोविड-19 संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक.
दुपारी 1:30 वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 2:00 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम राहतील.

बुधवार दि. 28 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता चंद्रपूर येथून सावलीकडे प्रयाण करतील.सकाळी 10:00 वाजता सावली येथील कोविड सेंटरला भेट.सकाळी 10:15 वाजता ग्रामीण रुग्णालय सावलीला भेट.
सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय सावली येथे कोविड आढावा बैठक. दुपारी 2:15 वाजता सावली येथून चक विरखल ता. सावलीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता चक विरखल ता. सावली येथे आगमन व श्री.तांगडे यांच्याकडे सांत्वनपर भेट देणार आहेत. दुपारी 3:00 वाजता चक विरखल ता. सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता गडचिरोली सामान्य रुग्णालय व कोविड सेंटरला भेट. सायंकाळी 4:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कोविड आढावा बैठक घेतील. रात्री 6:00 वाजता शासकीय विश्रामगृह, रानफूल निवास, पोटेगाव रोड,गडचिरोली येथे आगमन व मुक्काम करतील.

गुरुवार, दि.29 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता गडचिरोली येथून ब्रह्मपुरी जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
सकाळी 10:15 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10:30 वाजता ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरला भेट देतील. सकाळी 10:45 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 2:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागभीडकडे प्रयाण करतील. दुपारी 2:20 वाजता नागभीड येथे आगमन व कोविड सेंटरला भेट देतील. दुपारी 2:40 वाजता तहसील कार्यालय नागभीड येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 3:30 वाजता नागभिड येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:00 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम.शुक्रवार दि.30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता ब्रह्मपुरी येथून राजुरा जि. चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव राहतील. सकाळी 11:15 वाजता राजुरा येथील कोविड सेंटरला भेट देतील. सकाळी 11:30 वाजता उपविभागीय कार्यालय ( महसूल) राजुरा येथे कोविड आढावा बैठक घेतील. दुपारी 1:00 ते 2:00 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 2:00 वाजता राजुरा येथून बल्लारपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता बल्लारपूर येथे आगमन व कोविड सेंटरला भेट देतील.
दुपारी 3:00 वाजता उपविभागीय कार्यालय (महसूल) बल्लारपूर येथे अधिकाऱ्यांसमवेत कोविड आढावा बैठक घेतील. सायंकाळी 4:00 वाजता बल्लारपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन
सायंकाळी 7:00 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम राहतील.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here