Home Covid- 19 लस देताका लस !!राजुरा उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मागील पाच, सहा दिवसापासून...

लस देताका लस !!राजुरा उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मागील पाच, सहा दिवसापासून नागरिक हैराण !! रुग्णांलय बनले शोभेची इमारत …

60
0

राजुरा .

राजुरा ग्रामीण रुग्णालयात मागील पाच सहा दिवसापासुन लस नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

राजुरा शहरात ग्रामीण रुग्णालय ची भव्य दिव्य इमारत आहे,इमारतीचे उद्घाटन सुद्धा झाले,जनतेला खूप आनंद झाला आता आपणाला सर्व आरोग्य सुविधा राजुरा तच मिळणार पण झाले उलटेच ,अनेकांनी पहिला लसीचा डोज घेतल्यानंतर दुसरा डो ज आधी 28 दिवसानंतर होता नंतर 45 दिवस झाले.

ज्यांनी आधी लस घेतली त्यांना दुसऱ्यांदा लस घेताना मोठा त्रास होत आहे.

ज्या नागरिकाचा दुसऱ्यांदा लस घेण्यास रुग्णालयात जातात तेव्हा त्यांना पायपीट करण्याची पाळी येत आहे.त्याना अजूनही दुसरा डोज मिळाला नाही केव्हा मिळणार त्या साठी कोणीही सांगायला तयार नाही .

आता पुन्हा 1मे पासून 18 वर्ष वरील लोकांना लस देण्याचे सरकारनी जाहीर केले .परंतु योग्य प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने ,आरोग्य विभागाचे अधिकारी ,कर्मचारी त्रस्त झाले आहेत ,जो तो नागरिक आरोग्य विभागाला विचार ना करतो किती लोकांना उत्तर द्यायचे त्याचीही मर्यादा असते,पण शेवटी डॉ सुध्दा माणूसच आहे,पण नागरिक सुध्दा काय करणार शासनाचे झालेले निर्णय टि व्ही वर पाहुन नागरिक दावाखान्यात जात   असतात ,दोष कुणाला द्यायचा ,आता लोकप्रतिनिधींची पाळी आहे,जिल्ह्यात लय भारी लोकप्रतिनिधी आहेत ,त्या सर्वांनी मिळून राजकारण न करता चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागरिक यांचेसाठी आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी ,यांची प्रथम दखल घ्यावी लागेल तेही कर्मचारी आहेत अनेक ठिकाणी पद रिक्त आहेत ते सुध्दा अजून पावेतो भरले नाहीत ,अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही ,अप डाऊन करतात जाण्यातच वेळ जातो आणि दिवसभर अतिरिक्त कामाचा बोजा ,शेवटी तोही माणूस पण काय करणार !

आपल्या जिल्ह्यात देशमुख साहेबाचा दौरा आहे.त्यानंतर पालक मंत्री साहेबाचा दौरा या दौऱ्यात लोकप्रतिनिधींनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील समस्या मांडून मंजूर करून घेतल्या पाहिजे, वीरुर् येथील आरोग्य विभागाची इमारत बांधून तयार आहे.त्या ठिकाणी आरोग्य सेवा सुरू करा म्हणून नागरिकानी ,  लोकप्रतिनिधी ,आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी याना अनेक निवेदन दिलेत पण अजूनही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला घाम फुटला नाही ,शोभेची इमारत तयार केली ,फायदा ठेकेदाराचा ! केला जनता बोंबा बोंब करत आहे.

अशा अनेक समस्या आहेत परंतु आधी आरोग्य सेवा कशी सुरळीत होईल याचेकडे प्रथम लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here