Home Breaking News १२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा...

१२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करा । मुख्यमंत्री यांचेकड़े मागनी …

63
0

प्रति,
मा.ना.उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विषय : १२ बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेजची घोषणा करणेबाबत.

मार्फत : मा.जिल्हाधिकारी महोदय जिल्हाधिकारी कार्यलय…./ मा.तहसीलदार महोदय…..

महोदय,

वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास निवेदन सादर करण्यात येते की, दि.५ एप्रिल 2021 पासून राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, इत्यादी १२ बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आधिच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लॉकडाऊन मुळे अधिक जास्त आर्थिक अडचणीत आलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे. आपण लॉकडाऊन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक साहाय्य जाहीर केले. परंतु न्हावी, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी १२ बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.

करीता आपण राज्यातील १२ बलुतेदारांबाबत सहानुभूती पूर्वक विचार करून १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटूंब किमान ५०००/- रुपये आर्थिक साहाय्य करावे ही विनंती.

तसेच आपल्या जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत बेड उपलब्ध होत नाही याकरिता कोविड केअर सेंटर तालुका स्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल याबाबत आपण शासन स्तरावर प्रयत्न करावे ही विनंती.
अर्जदार
शंकरराव धन वलकर, अधक्ष्य भाजपा ओबीसी आघाडी, राजुरा
सदस्य, शेतकरी सल्लागार समिती, राजुरा

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here