Home आपला जिल्हा चंद्रपुरातील हतबल कोरोना रुग्णांची आशा “डॉ. अभिलाषा”

चंद्रपुरातील हतबल कोरोना रुग्णांची आशा “डॉ. अभिलाषा”

77
0

Pratikar News

एप्रिल २६, २०२१

चंद्रपूर – “आपदा मे अवसर” हे वाक्य या कोरोना महामारीत खरं ठरलं आहे, आज नागरिकांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे, ही कोरोनाची लाट सामान्य नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
शहरात तर अक्षरशः रेमडीसीविर, एम्ब्युलन्स चालक व डॉक्टर्स या हतबल नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकत असतांना, या हतबल व कोरोना सोबत लढत असलेल्या नागरिकांच्या मदतीला देवरूपी चंद्रपुरातील रॉबिन हुड सारखेच डॉ. गावतुरे दाम्पत्य धावून आले आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दररोज हजारोच्या वर बाधितांची भर पडत आहे, मृत्युदर वाढला आहे.
मात्र अश्यातच आर्थिक दृष्ट्या ढासळलेल्या कोरोना बाधित परिवाराच्या दुःखाला समजून डॉ. अभिलाषा व डॉ. राकेश गावतुरे हे दाम्पत्य निःशुल्क उपचार करण्यासाठी पुढे आले.
काही दिवसांपूर्वी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आपला हा मानस समाजमाध्यमांवर व्यक्त केला त्या दिवसापासून त्यांना दररोज शेकडो फोन येत आहे, त्यांच्या हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या रांगा लागत आहे.
14 दिवसाच्या गृह विलीगिकरणात सुद्धा रुग्णाला प्रतिदिवस 3 ते 6 हजार रुपये लागत आहे मात्र संचारबंदीच्या काळात रोजगार गमावलेले व आर्थिक दृष्ट्या खचलेल्या नागरिकांसाठी डॉ. गावतुरे देवदूतासारखे पुढे आले.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना अशी सेवा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आज जिल्ह्यात रेमडीसीविर, ऑक्सिजन व बेडसाठी नागरिक आस लावून असतात आपल्या रुग्णाचे कसे होणार? ह्या विचारात ते खचून गेले आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी निशुल्क सेवा देण्याचा मनोदय जाहीर करताच त्यांना रोज शेकडो फोन कॉल्सला उत्तर द्यावे लागत आहे. कोविड रुग्णांनी अशा पद्धतीच्या सेवाभावी वृत्तीची गरज असल्याचे सांगत यांच्या प्रयत्नांना भरभरून पाठिंबा दिला आहे.

आजघडीला गृह विलीगिकरणासाठी विलीगिकरण अर्जावर खाजगी डॉक्टरची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे मात्र त्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी खाजगी डॉक्टर हजारो रुपये लाटत आहे, मात्र ही स्वाक्षरी करण्यासाठी डॉ. अभिलाषा गावतुरे ह्या निःशुल्क अर्ज व स्वाक्षरी करीत सेवाभावी कार्याला पुढे नेत आहे.

एकदा व्यक्ती बाधित झाला की त्यावर होणारा खर्च रुग्णवाहिका- औषधे- ऑक्सिजन- व्हेंटिलेटर- रेमडीसीविर इंजेक्शन यामुळे रुग्ण व कुटुंब यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होते. मात्र समाजात अशा सेवाभावी वृत्तीचे शेकडो डॉक्टर्स पुढे आल्यास या संकटाच्या डोंगरातून मार्ग काढता येणे शक्य आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here