Home विशेष विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

2665
0

Pratikar News

प्रतिकार न्युज नेटवर्क
By
निलेश नगराळे

नागपूर : कोरोना बळीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयासमोर नातेवाइकांच्या किंचाळ्या ह्रदय पिटाळून लावणाऱ्या आहेत. स्मशानघाटातील राख थंड होत नाही तोच त्यावर पुन्हा चिता रचली जात आहे. सर्वत्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. मग आपल्या विकासासाठी अहोरात्र झटणारे लोकप्रतिनिधी काय करतात, लोकांना किती मदत करतात. या विदर्भातील आमदारांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येते. ५० लाखांपर्यंत त्यांनी निधीचे वाटप केले. तर सरकारने त्यात २० लाखांचा कोरोना निधी दिला आहे.

निवडणुकीच्या काळात बेंबीच्या देठापासून ओरडून-ओरडून विकासाच्या गप्पा केल्या जातात. प्रसंगी तेरवा आणि लग्नात काही पैशाची मदत करून राजा हरिचंद्राचे वंशच असल्याचा आव हे लोकप्रतिनिधी आणतात. गेल्या सव्वा वर्षापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना मदत मिळत नाही. रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाली आहे. लोक मरणावस्थेत आहेत. गेल्या महिनाभरामध्ये तर मृत्यूचे तांडव सुरू आहे. विदर्भातील ६१ आमदार काय करतात, त्यांचा निधी कुठे गेला. या आपत्तीच्या काळात त्यांनी आरोग्यावर किती निधी खर्च केला. तर अनेक आमदार हे या संकट काळात निधी खर्च करण्यास हात आखडता घेत असल्याचे दिसून आले.

आपत्कालीन परिस्थितीत जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही व खर्च भागविण्यासाठी आमदारांना आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्रत्येकी २०-२० लाख रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत देण्यात आला होता. मात्र विदर्भातील अनेक आमदारांनी हा निधी खर्च करण्यासाठी हात आखडता घेतल्याचे दिसून आले; तर काही आमदारांनी रुग्णवाहिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

नागपूर जिल्हा

समीर मेघे – १० लाख

अनिल देशमुख – २० लाख

टेकचंद सावरकर १० लाख

आशीष जयस्वाल – ००

राजू पारवे – ००

सुनील केदार – ००

अकोला –

डॉ. रणजीत पाटील १९ लाख ९५ हजार

गोवर्धन शर्मा २० लाख,

नितीन देशमुख यांनी २०

हरिष पिंपळे ७५ लाख रुपये

गोपीकिशन बाजोरिया ४ लाख ५० हजार,

प्रकाश भारसाकळे १० लाख

अमोल मिटकरी १० लाख

रणधीर सावरकर- ००

बुलडाणा

संजय गायकवाड १ कोटी २० लाख

श्वेता महाले १ कोटी ७० लाख,

डॉ. राजेंद्र शिंगणे १ कोटी ६३ लाख

डॉ.संजय कुटे ७० लाख

राजेश एकडे ७४ लाख

संजय रायमूलकर ७० लाख

अमरावती जिल्हा

अ‍ॅड. यशोमती ठाकूर : २० लाख

सुलभा खोडके : २० लाख

प्रताप अडसड : २० लाख

राजकुमार पटेल : २० लाख

बच्चू कडू : २० लाख

रवी राणा : २० लाख

प्रवीण पोटे : २० लाख

अरुण अडसड : २० लाख

बळवंत वानखडे : २० लाख

देवेंद्र भुयार : २० लाख

हेही वाचा: नागपुरातील अजनीत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; प्रियकराने दिला धोका

यवतमाळ

मदन येरावार – ५० लाख

प्रा.डॉ.अशोक ऊईके – ५० लाख

संजय राठोड – ५० लाख

इंद्रनील नाईक – ५० लाख

संजीवरेड्डी बोदकुरवार – ५० लाख

आर्णी संदीप धुर्वे – ५० लाख

नामदेव ससाने- ५० लाख

डॉ. वजाहत मिर्झा – ५० लाख

निलय नाईक – ५० लाख

जिल्हा वर्धा

डॉ. पंकज भोयर – ३६ लाख

रणजित कांबळे -७८ लाख

समीर कुणावार – १ कोटी ४५ लाख

दादाराव केचे- ०० ।

गोंदिया जिल्हा

विजय रहांगडाले – ६० लाख ८० हजार

मनोहर चंद्रिकापुरे – १ कोटी

सहसराम कोरोटे – १ कोटी

विनोद अग्रवाल – दोन कोटी ४० लाख

भंडारा जिल्हा

नाना पटोले – ५० लाख

नरेंद्र भोंडेकर – ५० लाख

राजू कारेमोरे – ५० लाख

गडचिरोली जिल्हा

डॉ. देवराव होळी – १० लाख

धर्मरावबाबा आत्राम – २० लाख

कृष्णा गजबे – ६५ लाख

चंद्रपूर जिल्हा

विजय वडेट्टीवार – ३७.७५ लाख,

किशोर जोरगेवार – ४७. ७९ लाख,

सुधीर मुनगंटीवार – ४७.१८ लाख

प्रतिभा धानोरकर – ३० लाख,

बंटी भांगडिया – १४.४९ लाख

सुभाष धोटे – ४७.२५ लाख.

संपादन – निलेश नगराळे

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here