Home Covid- 19 चुनाळा ठरतोय कोरोणाचा हॉटस्पॉट 5 रूग्णांचा मृत्यू ! ...

चुनाळा ठरतोय कोरोणाचा हॉटस्पॉट 5 रूग्णांचा मृत्यू ! उपकेंद्रातील 100 हून अधिक बाधित उपकेंद्राचे सि.एच.ओ. डेप्युटेशनवर विसापूरला….

74
0

राजुरा…

चुनाळा ठरतोय कोरोणाचा हॉटस्पॉट

5 रूग्णांचा मृत्यू

उपकेंद्रातील 100 हून अधिक बाधित

उपकेंद्राचे सि.एच.ओ. डेप्युटेशनवर विसापूरला

पूर्णवेळ सि.एच.ओ आणि लसिकरण केंद्र सुरू करण्याची सुदर्शन निमकरांची मागणी

राजुरा
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोराणाचा प्रादूर्भाव दिसून येत असून चुनाळा उपकेंद्राअंतर्गत 100 हून अधिक कोरोणाबाधित रुग्ण असून 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असल्याने चुनाळा कोरोणाचा हॉटस्पॉट ठरत असतांना आरोग्य विभागाने येथील सि.एच.ओ. ला विसापूर येथील कोविड सेंटरला डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्याने संताप व्यक्त केल्या जात असून त्वरीत पूर्णवेळ सि.एच.ओ. देऊन लसिकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे आरोग्य विभागाचे वर्धिनी उपकेंद्र आहे. या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या जवळपास 6000 असून प्राथमिक आरोग्य केंद्र हे 35 किमी अंतरावर चिंचोली (बु) येथे आहे. चुनाळा, बामनवाडा गावात सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजाराचे मोठ्या प्रमाणात रूग्ण असून कोरोणाचा शिरकाव आहे. उपकेंद्राअंतर्गत जवळपास 100 रूग्ण कोरोणाबाधित आहेत. त्यापैकी 35 रूग्ण कोविड सेंटरला असून इतर क्वॉरंटाईन आहेत तर 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून चुनाळा हे कोरोणाचे हॉटस्पॉट ठरत आहे. असे असतांना आरोग्य विभागाने येथे कार्यरत सि.एच.ओ. चे विसापूर येथील कोविड सेंटर ला डेप्युटेशनवर पाठविण्यात आले आहे ही बाब अंत्यत गंभिर असून गावातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. चुनाळा उपकेंद्राअंतर्गत 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांची लोकसंख्या 1331 असून 1 मे पासून 25 वर्षे वयोगटातील नागरीकांना कोराणा लसिकरण करण्यात येणार असतांना सुद्धा या ठिकाणी लसिकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र 35 किमी अंतरावर असल्यामुळे व राजुरा येथील केंद्रात शहरी भागातील गर्दी असल्यामुळे येथील नागरीकांना लस घेणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
गावातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असतांना सि.एच.ओ. चे डेप्युटेशन हे चुकीचे असून त्यांचे डेप्युटेशन त्वरीत रद्द करूण चुनाळा येथे लसिकरण केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी निवेदनाद्वारे केली असून राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सुद्धा चुनाळा येथे पूर्णवळ सि.एच.ओ. देऊन कोरोणा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची तसेच लसिकरण केंद्र सुरू करूण जास्तीत जास्त लसिकरण करण्याची मागणी केली आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here