Home Breaking News महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

53
0

pratikar News 

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन
Date : 23 Apr 2021

चंद्रपूर : चंद्रपूर  शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी बालाजी वॉर्ड येथील बजाज पॉलिटेक्निक कॉलेज येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, नगरसेवक सर्वश्री संजय कंचर्लावार, अशोक नागापुरे, दीपक जयस्वाल, प्रशांत दानव, नगरसेविका सुनीता लोढीया, विना खानके, सीमा रामेडवार उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलतांना महापौर म्हणाल्या की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. त्यामुळे कोरोनावरील प्रतिबंधात्मक

लसीमुळे कोरोनापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी.

तसेच लसीकरण केंद्रावर गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून एका रांगेत उभे रहावे. लस प्रत्येकालाच दिली जाणार आहे त्यामुळे गर्दी करू नका प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करा व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. लस घेल्यानंतर सुद्धा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या.

सध्या मनपा हद्दीत 13 शासकीय आणि 4 खासगी केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार जी लसीकरण केंद्र सुरू अथवा बंद राहतील याची माहिती मनपाच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेज आणि वेबसाईटवर देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here