*सावली तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा तडाखा*..
*चक्री वादळामुळे तालुक्यातील अनेक घरांची व फळबागांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान..
*प्रशासनाने तात्काळ पाहणी व पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी
कवठी : काल झालेल्या अवकाळी पाऊस व चक्री वादळामुळे सावली तालुक्यातील कवठी, पारडी, रुद्रापूर, सिंगापूर, उसेगाव, जिबगाव इ. अनेक गावांना याचा चांगलाच तडाखा बसला. जोराच्या चक्री वादळामुळे अनेक गावातील घरांच्या भिंती, कवेलू, टिन पत्रे, कोसळल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडासी आलेले घास म्हणजे यावर्षीचे ऐन भरणीस आलेले डोलदार, डब्बल फसल धान पीकाचे,व मका पिकांची आणि आंबा, चिंच, पेरू, चिकू इत्यादी फळ बागाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने प्रशासनाने पाहणी वं पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सावली तालुक्यातील नागरिकांनी केलेली
प्रतिकार न्यूज