विरुर…
खांबाळा नाल्यातून रेती तस्करी पोलीस पाटील यांचे संरक्षण असल्याचा आरोप गावातील नागरीकानी केला आहे.
विरूर परीसरात सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.ती म्हणजे रेती तस्करी ,खांबाळा नाल्यातून चार,पाच ट्रकटर रेतीची तस्करी करीत असल्याने,शासणाला कोटयावधी रुपयांचा फटका बसत आहे.तर दुसरीकडे रेती तस्करी रेती विक्री करण्यासाठी कांहीं ठिकाणीं एजंट म्हणून काम करत आहेत.विरुर परीसरात सरकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ,आणि या तस्करांना गावातील मुखीयाचाच समर्थन असल्याने, रेतीची चोरी होते.खांबाळा गावात चक्क पोलीस पाटलांच्या संरक्षणात रेती चोरी होत असल्याचा आरोप गावातील नागरीकानी केला आहे.पोलीस पाटील असल्याने,त्यांचे विरोधात कोणीही तक्रार करत नाही.गावात ,सरकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने, होत असलेल्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.महसुल विभागांनी या बाबतीत सर्व ठिकाणी गावकरी आणि सरकारी कर्मचारी यांचेवर जबाबदारी देण्याची गरज आहे.स्थानीक स्वराज्य संस्थांच्या कामात चोरीच्या रेतीचा वापर करून कामे करीत आहे.तसेच 100 फुट रेती ऐवजी सत्तर अंशी फुट रेती खरेदी-विक्री होत आहे.त्यामुळे खरेदी करणारे यांचे आर्थिक लुट होते.तालुक्यात सर्व ठिकाणी रेती तस्करी करणाऱ्या लोकांना रान मोकळे झाले आहेत.