राजुरा …
राजुरा शहरात असलेले एक तरुण उमदा युवक नोकरीच्या मागे न लागता काहीतरी करायचे या उद्देशाने भाजी मार्केट मध्ये ठोक भाजी मार्केट ची विक्री करायला सुरावात केली अल्पावधीतच शहरातील भाजी विक्रेते यांचे विश्वास संपादन केले आणि सर्वांना ठोक भाजीपाला पुरवठा करू लागले.
पण नियतीला काही वेगळेच करायचे होते .आणि त्याचे दुःखद निधन सर्वांना चटका देणारे आहे.
बंडू भाऊ यांचे नाव राजेश होते .पण त्यांना सर्व लोक बंडू भाऊ म्हणूनच ओळखत होते .तरुणाचे एक प्रकारचे व्यवसाय नेत्वृत्व हरपले .
राजुरा शहरातील *राजेश उर्फ बंडुभाऊ भोज* यांचे आज सकाळी रुद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले ते अत्यंत शांत व नेहमी मदत करणारे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने शहरात शोकाचे वातावरण पसरले आहे..
आज भोज कुटुंबावर दुःखाचा डोंगर ,त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून दूर करण्याची शक्ती मिळो अशी राजुरा जनतेकडून मंगल कामना , त्यांच्या आत्म्याला शांती देवो व त्यांच्या परिवाराला या दुखातुन निगण्याची हिंमत देवो
बंडू भाऊ याना प्रतिकार न्यूज पोर्टल कडून विनम्र अभिवादन
प्रतिकार न्यूज