pratikar News
एप्रिल २१, २०२१
चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या मृत्युदर सुद्धा वाढला आहे, मात्र या परिस्थितीवर अजूनही नियंत्रण प्रशासनातर्फे मिळविण्यात आले नाही.
रुग्णांना बेड, रेमडीसीविर व ऑक्सिजन न मिळत नसल्याने अनेक रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचारासाठी जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी प्रशासनासोबत बैठकांचा धुराळा घेतला,
नियोजन भवन येथे पालकमंत्री वडेट्टीवार हे पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले असता, त्यांनी देश व राज्यातील गंभीर परिस्थिती कथन केली.
पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ठाण मारून बसणार का? या प्रश्नावर त्यांनी मी राज्याचा मंत्री आहे मला संपूर्ण राज्यातील आरोग्याबाबत माहिती घ्यावी लागते, चंद्रपूर जिल्ह्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचेकडे दिले आहे, मी त्यांना वेळोवेळी सूचना करीत असतो.
जिल्ह्यातील बेड च्या कमतरतेवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला माझ्या जावयाला बेड मिळाला नाही, आम्हाला सुद्धा वेदना आहे.
जावयाला बेड मिळाला नाही तर वडेट्टीवार यांना परिस्थिती चे गांभीर्य कळले का? राज्यातील, जिल्ह्यातील जनता बेड व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू पावत आहे त्यांच्या परिवाराच्या वेदना कोण समजणार मंत्री साहेब..
अजूनही जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी वाट बघावी लागणार आहे, बेड ची संख्या वाढविण्यासाठी सुद्धा काही वेळ लागणार आहे, कोरोना चे भयावह संकट दोन दिवसांपूर्वी आले नव्हते, ज्यावेळी नागपूरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली त्यावेळी आपण उपाययोजना करायला हवा होत्या.
त्यावेळी जर आपण आरोग्य विभागासोबत बैठक घेत कोरोना लाटेबाबत सूचना दिल्या असत्या तर आज ही परिस्थिती उदभवली नसती.
Post Views:
58