Home Covid- 19 भद्रावती येथे शंभर खाटांच्या नवीन कोविड सेंटरचे खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

भद्रावती येथे शंभर खाटांच्या नवीन कोविड सेंटरचे खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

61
0

Pratikar News


भद्रावती तालुका प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय भद्रावती व नगर परिषद भद्रावती यांच्या संयुक्त सहकार्याने शहरातील श्री मंगल कार्यालयात तयार करण्यात आलेल्या १०० खाटांच्या कोविड-१९ उपचार केंद्राचे उद्घाटन दि.२० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता खा.बाळू धानोरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी आ. प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, वैद्यकीय अधिकारी मनीष सिंग, रवींद्र शिंदे, ठाणेदार सुनील सिंग पवार, मुनाज शेख, डॉ. सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे येथील जैन मंदीरातील कोविड सेंटर अपुरे पडू लागले.त्यामुळे हे नवीन कोविड सेंटर उघडण्यात आले.या अतिरिक्त उपचार केंद्रामुळे कोरोना बाधीत रुग्णांना दिलासा मिळाला आहे.या कोविड रुग्णालयासाठी येथील रवींद्र शिंदे यांनी स्वतःचे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. भद्रावती पालिकेतर्फे येथे १०० खाटांची व्यसवस्था करून दिली. तर ग्रामीण रुग्णालयतर्फे येथे आपल्या संपूर्ण स्टाँपसह रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या जैन मंदिर कोविड सेंटरमध्ये आधी १०० खाटांची व्यवस्था होती. या नवीन उपचार केंद्रामुळे आता २०० रुग्णभरतीची सुविधा झाली आहे. शहरातील वाढत्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरातील नागरिकांनी भविष्यात गरज पडल्यास मदतीसाठी समोर यावे असे आवाहन देखील यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यांनी केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here