Home Breaking News संजय घटे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन. आॅक्सिजन बेड साठी दोन...

संजय घटे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन. आॅक्सिजन बेड साठी दोन राज्यत नातेवाईकांची धडपड !अखेर तेलंगणात मृत्यू ..

1155
0

संजय घटे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन.आॅक्सिजन बेड साठी दोन राज्यत नातेवाईकांची धडपड.

राजुरा (ता.प्र) :– सध्या कोरोनामुळे सर्वत्र अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियतीच्या पोटात काय दडले आहे ते कळत नाहीये. एक एक ओळखीची, नातेसंबंधातील माणसे मृत्यूला सामोरे जात आहेत. मुळचे साखरी येथील व सध्या राजुरा येथे वास्तव्यास असणारे संजय घटे यांचा आज कोरोनामुळे तेलंगणा येथे मृत्यू झाला.
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्य़ात बेड न मिळाल्याने त्यांचे भाऊ संतोष घटे यांनी स्वतःची फोरवीलर घेऊन जीवाची बाजी लावून त्यांना शेवटी तेलंगण्यात करीमनगर येथे आॅक्सिजन बेड मिळवून उपचार सुरू केले मात्र तेथेही एका दिवसात आॅक्सिजन तुटवडा झाल्याने मंचिराल जवळील एका मोठ्या दवाखान्यात दाखल केले. येथेही एक रात्रभर आॅक्सिजन मिळाले. शेवटी आज पून्हा एका दुसर्‍या दवाखान्यात सिफ्ट करण्यात आले मात्र केवळ आणि केवळ आॅक्सिजन च्या अभावाने आणि प्रशासनाच्या जीवघेण्या नियोजनामुळे संजय घटे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. ते वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील नियोजन अधिकारी जी.पूल्लया यांच्या अपमानास्पद वागणूकीने त्रस्त होऊन आत्महत्या करून जीवन संपविणाऱ्या आशा घटे हिचे मोठे वडील होते. तीला न्याय मिळवून देण्यासाठी ते पत्रकार, पोलीस अधीक्षक, नेते यांच्या भेटी घेऊन झटत होते. आजघडीला आशा घटे हिला जाऊन २० दिवस पुर्ण होत आलेत, वेकोली अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही मात्र तीला न्याय मिळवून देण्यासाठी झटनारा शिपाई कोरोनामुळे हरवला आहे. ते ४८ वर्षाचे होते. त्यांच्या नंतर पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ आणि साखरी, राजुरा येथील बराच मोठा आप्त परिवार शोकाकुल आहेत.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here