Home Breaking News कडक म्हणजे एकदम कडक लॉकडाऊन; आज मध्यरात्रीपासूनच आता दारुच काय साधा...

कडक म्हणजे एकदम कडक लॉकडाऊन; आज मध्यरात्रीपासूनच आता दारुच काय साधा चहा पण मिळणार नाही. Total Lockdown

135
0

Pratikar News

कडक म्हणजे एकदम कडक लॉकडाऊन; आज मध्यरात्रीपासूनच Total Lockdown

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. राज्यात दर तीन मिनिटांला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याने काळजी आणखी वाढली आहे. राज्यात दर तीन मिनिटांला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत आहे. वाढती आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. किराणा मालाच्या दुकानांच्या वेळांसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या नियमावलीमुळे

आता दारुच काय साधा चहा पण मिळणार नाही.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. राज्यात दर तीन मिनिटांला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याने काळजी आणखी वाढली आहे. राज्यात दर तीन मिनिटांला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत आहे. वाढती आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. किराणा मालाच्या दुकानांच्या वेळांसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या नियमावलीमुळे आता दारुच काय साधा चहा पण मिळणार नाही.

अशी आहे नविन नियमावली

 • किराणा दुकाने सकाळी ७ ते ११
 • दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
 • भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
 • फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
 • अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११
 • कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
 • पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
 • पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
 • पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
  या बाबींचे जनतेने पालन करावे.
 • हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
 • धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
 • आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
 • भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
 • दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
 • टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.
 • चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
 • दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
 • सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
 • कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
 • शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
 • स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
 • विवाह समारंभास बंदी राहील.
 • चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.
 • अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
 • सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
 • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
 • सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
 • सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
 • व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
 • बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here