Home आपला जिल्हा विसापुरात वापरलेल्या इंजेक्शनचा ढीग, कोरोना महामारीत नव्या रोगांना आमंत्रण

विसापुरात वापरलेल्या इंजेक्शनचा ढीग, कोरोना महामारीत नव्या रोगांना आमंत्रण

44
0

 

Pratikar News

बल्लारपूर – 19/04/2021 ला स्वराज्य सामाजिक संघटना जि.चंद्रपूर /प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर विसापूर यांचा कडून ऑनलाईन मार्फत (व्हॅटसप्प चा मार्गाने )व कॉल करून विसापूर ग्रामपंचायत कार्यालय मा. श्री सरपंच /उपसरपंच व सचिव साहेब यांना निवेदन पाठवून कळविण्यात आले कीं विसापूर मध्ये वॉर्ड 1 बल्लारपूर मार्ग पुरबुडी जवळ त्या भागा मध्ये मानवी बिमारी साठी वापर (उपयोगी)झालेले एक्सपायर इंजेकशन त्या ठिकाणी रोड चा बाजूला टाकण्यात आले आहेत अशी माहिती मधुकर भोयर यांनी दिली होती.

स्वराज्य सामाजिक संघटना /प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर विसापूर मध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ता प्रितम पाटणकर यांनी तात्काळ ते उचलून विसापूर गावाच्या बाहेर टाकण्यात यावे कारण तो परिसर मानवी वस्तीचा आहे.
व त्या रोड वरून शेतीकरी आपल्या शेतामध्ये जात असतात व लहान मुलं सुद्धा असतात, व त्या भागात मध्ये गुरे जाणवरे (प्राणी )सुद्धा येणे-जाणे करीत असतात म्हणून त्या इंजेकशनच्या ढगामुळे कोणत्याही प्रकारचे कोणत्या प्राण्यांना, नागरिकांना हानी/दुष्परिणाम होणार नाही याची काळजी करावे व तात्काळ तिथून उचलून कुठे तरी गावाच्या बाहेर टाकावे असे निवेदनचा मार्फत सांगण्यात आले व लवकरच समस्याचे निवारण होणार या अनुषंगाने विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच अंकेश्वर मेश्राम यांना माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here