Home विशेष *दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या लसीकरण केंद्रांना भेटी*

*दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या लसीकरण केंद्रांना भेटी*

45
0

Pratikar News

नागपूर, २० एप्रिल
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात आज सुमारे ६ लसीकरण केंद्रांना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या.

या लसीकरण केंद्रांवर अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आहे आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लसीकरण अभियानाला मिळत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत चाचण्या, संपर्कशोध आणि उपचार, यासोबतच अधिकाधिक लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे, असेही त्यांनी सांगितले. आज ज्या केंद्रांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या त्यात समर्थनगर लसीकरण केंद्र, इनडोअर स्टेडियम कॉम्प्लेक्स विवेकानंद नगर, दुर्गा मंदिर सोनेगाव, महापालिका आयुर्वेद रुग्णालय पांडे लेआउट, रा.स्व.संघ लोककल्याण समिती चिकित्सा केंद्र राजीव नगर आणि गायत्री नगर इत्यादि केंद्रांचा समावेश होता. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किशोर वानखेडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, सोनाली कडू, गायत्री दुबे, सुरेंद्र पांडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here