Home Covid- 19 चंद्रपूर महावितरण परिमंडळात कोरोनाचे सावट

चंद्रपूर महावितरण परिमंडळात कोरोनाचे सावट

46
0

Pratikar News

चंद्रपूर – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याना रुग्णालयातील बेड व इतर आरोग्यविषयक मदत तसेच विविध आरोग्य यंत्रणेषी समन्वय साधन्यासाठी चंद्रपूर परिमंडल कार्यालयामध्ये कोविड-19 समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर परिमंडलातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्याना आरोग्यविषयक मदत करण्यासाठी हा कक्ष काम करीत आहे.
दरम्यान मागील वर्षांपासून आतापर्यंत चंद्रपूर परिमंडलातील 85 अधिकारी व कर्मचाऱ्याना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी 63 कोरोनामुक्त झाले असून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. मृत्युमुखी पडलेल्या 3 पैकी 2 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 30 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत 19 अधिकारी व कर्मचारी रुग्णालय आणि घरी उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंता व कर्मचारी सुरळीत व अखंडित वीजपुरवठयासह विविध ग्राहकसेवा देत आहेत. मात्र चंद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात देखील गेल्या महिन्याभरापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी चंद्रपूर परिमंडल कार्यालयात कोविड-19 समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. योगेश गोरे हे कक्षप्रमुख म्हणून काम पाहत आहे. रुग्णलयांशी संपर्क साधून बेड उपलब्ध करुन देणे तसेच प्लाझ्मा, औषध व इतर मदत उपलब्ध करुन देण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे.
महावितरणमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांसाठी कोरोना असलेला समूह आरोग्यविमा काढण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य सेवेबाबत काही अडचणी असल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यानी किंवा त्यांच्या कार्यालयप्रमुखांनी थेट उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. गोरे यांच्याषी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.अ त्यावश्यक असलेल्या वीज क्षेत्रात ग्राहकसेवा देताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा क्षेत्रीय काम करताना कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घ्यावी तसेच कार्यालयांमध्ये कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देष मुख्य अभियंता श्री. सुनिल देषपांडे यांनी दिले आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here