Home विशेष राज्य सरकारच्या योजना *आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी योजनेतून आर्थिक मदत*

राज्य सरकारच्या योजना *आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी योजनेतून आर्थिक मदत*

70
0

*आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी योजनेतून आर्थिक मदत*

: अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अर्थसाहाय्य दिले जाते. भारतीय घटनेने जातीयता नष्‍ट केली आहे. ती पाळणाऱ्यास शिक्षा तसेच दंडाचीही तरतूद आहे. एकीकडे जातीयवाद्यांना कायद्याचा धाक आणि दुसरीकडे जातीच्‍या भिंती पाडणाऱ्यांना प्रोत्‍साहन असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह योजनेतून जोडप्यांना अर्थसाहाय्य पुरवले जाते.

🧐 *योजनेसाठी प्रमुख अटी* :
▪️लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा
▪️लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
▪️विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.

💰 *दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप* : ५० हजार रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम केंद्र व उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य यांकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. तसेच डॉ. आंबेडकर फाऊंडेशनतर्फे अडीच लाख असे एकूण *३ लाख रुपये* मदत निधी मिळतो. जातीचा उंबरठा ओलांडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी विवाह झाला असल्यास त्यांना 15 हजार रुपये शासनाकडून प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

📝 *आवश्यक कागदपत्रे* :
✔️ जातीचा दाखला आवश्यक
✔️ लाभार्थी /विवाहीत जोडप्याचे कोर्टातील विवाह नोंदणी /दाखला
✔️ वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले
✔️ दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे, वधु /वराचे एकत्रित फोटो
✔️ बँकेचे जॉइंट अकाऊंट पासबुक झेरॉक्स (आधारलिंक अनिवार्य)

🔍 *योजनेची अधिक माहिती* : या योजनेत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येत होते. मात्र अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना आदेश १९५० मध्ये सुधारणा करुन अनुसूचित जातीसंबंधी घटना आदेश बौध्द धर्मियांना लागू करण्यात आल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अनुसूचित जातीची यादी हिंदू अथवा शिख अथवा बौध्द धर्मियांनाही लागू झालेली आहे. त्यानुसार बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्ती या योजनेखालील सवलती मिळण्यास पात्र ठरलेल्या आहेत.

📬 *संपर्काचे ठिकाण* : विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.

📍 *टिप* : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावे.

जनहित प्रकाशित
प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here