Home Covid- 19 नागपूर दहन घाटांवर कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांवर अंतिम संस्कार नि:शुल्क करा..पालकमंत्री डॉ.नितीन...

नागपूर दहन घाटांवर कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांवर अंतिम संस्कार नि:शुल्क करा..पालकमंत्री डॉ.नितीन राऊत*शोकाकुल परिवाराला लाकडे- शेण गोवऱ्या नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्र्यांची सूचना*

71
0

नागपूर..

*दहन घाटांवर कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांवर अंतिम संस्कार नि:शुल्क करा..पालकमंत्री डॉ.नितीन राऊत*

*शोकाकुल परिवाराला लाकडे- शेण गोवऱ्या नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्र्यांची सूचना*

नागपूर, १८ मार्च- नागपुरातील दहन घाटांवर कोेरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंतिम संस्कार मोफत करण्याच्या संदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या संदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे आणि रोज बाधित संख्या 7000 तर मृतकांची संख्या
85 च्या घरात पोहचली आहे. सद्यस्थितीत कोविड बाधित व्यक्तीला विविध आरोग्य तपासण्या, औषधोपचार, रुग्णवाहिका आणि रुग्णालयाचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. एवढे करुनही मृत्यूमुखी
पडल्यानंतर त्या शोकमग्न परिवाराला मनपाच्या दहन घाटांवर जसे सहकार नगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई आणि मानकापूर घाटांवर विद्युत दहन वाहिनी मध्ये नि:शुल्क सेवा देण्यात येते मात्र ह्या सहा दहन घाटांवर लाकडे आणि शेण गोवऱ्याद्वारे अंतिम संस्कार करायचे असल्यास सुमारे रु.2530/- घेण्यात येत आहे.

ज्याप्रमाणे मनपाच्या उर्वरित दहन घाटांवर नि:शुल्क सेवा देण्यात येते त्याचप्रमाणे ह्या सहा दहन घाटांवर देखील मनपाने नि:शुल्क सेवा द्यावी. कारण मृत नागरिक हा मनपाचा करदाता असल्याने मानवतेच्या भावनेतून मनपाने नि:शुल्क सेवा देणे अपेक्षित आहे. मृत व्यक्तीवर त्याच्या धर्म व्यवस्थेतील परंपरागत पद्धतीनुसार अंतिम संस्कार व्हावेत अशी शोकमग्न परिवाराची इच्छा असणे स्वाभाविक आहे. अनेक आप्तस्वकीय परंपरागत पध्दतीने अंतिम संस्कार व्हावेत असा आग्रह देखील धरतात. लाकडे- शेण गोवऱ्या रचून एकाच वेळी अनेक शवांवर अंतिम संस्कार करता येतात मात्र विद्युत दाहिनीमध्ये एका-नंतर-एक यानुसार विलंब लागतो आणि त्याकरिता घाटावर थांबणे अनेकांना शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ह्या सहा घाटांवर लाकडे आणि शेण गोवऱ्यांचा खर्च स्वत: वहन करुन मृत व्यक्तींच्या शोकमग्न परिवाराला दिलासा द्यावा आणि त्यादृष्टीने आदेश निर्गमित करावेत, अश्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here